महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?
चिमूर : मोबाईलचा डेटा मग हा डेटा जातो कुठे? अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेक जण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही जीबी डेटा मिळतो. परंतु, मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकूणच काय तर सध्या मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, आता एआय वापराच्या काळात मोबाईल धारकांना दिवसभर दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो? हे कळत नाही. कोणी सतत मोबाइलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठीच वापर करतात. या सगळ्यांना मोबाईल डेटा संपत असल्याचा अनुभव येतो.
डेटा संपताच छोट्या किंमतीचा रिचार्ज मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट स्पीड, डाऊन लोडिंग, व्हिडिओची गुणवत्ता आदींवर डेटा वापर ठरतो. असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.
मोबाईलवर 4G रेंज तरीही नेट स्लोच…
मोबाईलवर 4 जी ची रेंज असते. डेटा असतो तरीही इंटरनेटचे काम करत नाही. असे वारंवार होत असल्याचा अनुभव आहे. यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही. तोच तुमच्या दिवभरातील 50 टक्के डेटा वापरून झाला आहे, असा मेसेज येतो.