सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या भारतात प्रत्यार्पण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Sidhu Moose Wala Murder Case News in Marathi : वॉशिंग्टन : सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोप अनमोल बिश्नोई, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भावाला भारतात आणले जाणार आहे. भारतीय तपास यंत्रणा सध्या त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे. अमेरिकेतून त्याला हद्दपार केले जाणार आहे. हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.
अमेरिकेत बिश्नोई गॅंगच्या दोन कुख्यात गुंडांना अटक; भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु
अमेरिकेने अनमोलला केले हद्दपार
बाबा सिद्दी हत्या प्रकरणात महाराष्ट्राच्या न्यायालयाने अनमोलविरोधात वॉरंट जारी केले होते. यानंतर त्याच्याविरोधात इंटरपोलकडून रेड नोटिस देखील जारी करण्यात आली आहे. बाब सिद्दीकीचे पुत्र झीशान सिद्दीकी याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अनमोलला हद्दपार केले आहे. ही कारवाई केंद्रिय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्तपण केली आहे. याअंतर्गत सध्या अनमोल बिश्नोईला भारतात आणले जात आहे. सध्या तो भारतात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कविरोधात हे एक मोठा पाऊल मानले जात आहे.
अनमोल बिश्नोईवर (Anmol Bishnoi) अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांच्या हत्यांचे आरोप आहेत. यामध्ये सिद्धू मूसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तसेच अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (१८ नोव्हेंबर) सकाली १० वाजता अनमोल बिश्नोईला राजधानी दिल्ली येथे आणळे जाणार होते, यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या भारतात आल्यानंतर त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही वर्षांपूर्वी अनमोल परदेशात एका नाइट पार्टीत सिंगर करण औजला याच्यासोबत दिसला होता. त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. २०२४ मध्ये त्याला अमेरिकेत अठक करण्यात आली होती. तेव्हापूसन अनमोल अमेरिकन एजन्सीच्या ताब्यात होता.अनमोलचे भारतात प्रत्यार्पण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) सखा भाऊ आहे. बिश्वोई गँगचा अनेक आपरेशन्स नियोजन व व ते पूर्ण करणे अनमोल करत होता.
Ans: सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी याचे भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर न्याालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडी, चौकशी आणि पुढील प्रक्रियेसाठी नेले जाईल
Ans: सिद्धू मूसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दीकी हत्याकांड सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, तसेच अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईवर आरोप आहेत.






