मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इन्कमिंग कॉल आणि एसएमएस सेवा बंद करण्याची पद्धत कंपन्यांनी तातडीने थांबवावी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी इन्कमिंग सेवा तसेच एसएमएस सेवा कायमस्वरूपी चालू ठेवावी या मागणीसाठी आज राष्ट्र विकास सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात बंद पडलेल्या मोबाईलच्या माळा घालून अनोखे, लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. दरम्यान मोबाईल रिचार्ज कंपन्यांकडून लाईफ टाईम इन कमिंग चा वादा करूनही रिचार्ज संपल्यानंतर काही दिवसातच इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस सेवा कंपनीकडून बंद करण्यात येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन,लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडर नोंदणी, बँकिंग सेवा, आरोग्य सेवा, इन्शुरन्स आदींचे मेसेज ठप्प होतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना गैरसोय सहन करावी लागत असल्याने दूरसंचार मंत्र्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्याही गळ्यामध्ये फुलांच्या हाराऐवजी बंद पडलेल्या मोबाईलचे हार घातले जावेत असे आवाहन राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी केले आहे.