Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्गातही मॉक ड्रिल होणार ! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

उद्या म्हणजेच 7 मे 2025 रोजी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल घेणार आहेत. यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: May 06, 2025 | 09:34 PM
सिंधुदुर्गातही मॉक ड्रिल होणार ! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

सिंधुदुर्गातही मॉक ड्रिल होणार ! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणी ही ड्रिल बुधवार, ७ मे रोजी होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल आणि रात्री 8 वाजता 15 मिनिटांचा ब्लॅकआऊट होणार आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल यांचा सहभाग असणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

‘या’ कारणामुळे खारेपाटमधील 28 गावातील शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, ही मॉक ड्रिल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार घेण्यात येत आहे. सायरनद्वारे इशारा देण्यात येईल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. ४:१८ वाजता 1 मिनिटांसाठी सायरन वाजवून ड्रिल संपवण्यात येईल. मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सावंतवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण येथे सायरनची व्यवस्था आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायती व बँकांमधून सायरन वाजवले जातील.

रात्री ८ ते ८:१५ दरम्यान देवगड, वेंगुर्ला व मालवण सागरी भागात ब्लॅकआऊट होणार आहे. या काळात घरातील दिवे, वाहनांचे हेडलाईट्स यांचा वापर टाळावा. प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

हवाई हल्ला झाल्यास काय करावे?

वरच्या मजल्यावर असल्यास तळमजल्यावर जा.
घरात असताना कोपऱ्यात सुरक्षित राहा.
उघड्यावर असाल तर जमिनीवर झोपा, कानात बोटं घाला, तोंडात रुमाल ठेवा.
कार्यालय, शाळा याठिकाणी टेबलखाली लपावे.
गाडी चालवत असाल तर रस्त्याच्या कडेला थांबा.
रेल्वेने प्रवास करताना जागेवर बसून राहा.

Mock Drill: ‘उद्या चार वाजता भोंगे वाजणार पण,…’; जिल्हाधिकाऱ्यांचे पुणेकरांना आवाहन

काय टाळावे?

मोकळ्या मैदानात उभं राहू नये.
आग लागल्यास इमारतीवरून उडी मारू नये.
प्रकाशबंदीच्या काळात वीज वापर टाळावा.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्राणी मोकळे सोडू नयेत.

मॉक ड्रिलचे उद्दिष्ट काय?

युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि नागरिकांनी कसे वागावे याचा सराव म्हणजे मॉक ड्रिल. यामध्ये अलार्म, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा यांचा एकत्रित सराव करून परिस्थिती हाताळण्याची पूर्वतयारी केली जाते.

Web Title: Mock drill in sindhudurga citizens should not pay attention to the rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mock Drill
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?
1

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
2

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
3

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
4

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.