
Monsoon Red Alert:
राज्यभरात कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच काल (शनिवार ६ जून) राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले. पुण्यातील बारामती, इंदापूर तासेसिक्सह सातारा जिल्ह्यातील काही भागांत जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2026
दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असे आव्हान करण्यात आले आहे. याशिवाय, नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे
सातारा जिल्ह्यातील जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांनाही फटका बसला आहे. विशेषतः नुकतीच लागण करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटसह टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड
बारामती तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जावून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्यशासनाच्यावतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असेही पवार म्हणाल्या.
खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा