Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही ‘यलो अलर्ट’चा इशारा

वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 24.09 मिमी पावसाची नोंद झाली असून समुद्रपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. हवामान विभागाने शुक्रवारीही यलो अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून 92 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 04:05 PM
Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही 'यलो अलर्ट'चा इशारा

Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार; शुक्रवारीही 'यलो अलर्ट'चा इशारा

Follow Us
Follow Us:

वर्धा ब्युरो : रुसलेला वरुणराजा अखेर बळीराजावर प्रसन्न झाल्याने मंगळवारनंतर बुधवारीही जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार कायम होती. गत २४ तासात जिल्ह्यात २४.०९ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्यात घेण्यात आली. जिल्ह्यात पावसाची सुरू असलेली हळूवार का होई ना, ही संततधार पिकांसाठी संजीवनी ठरली आहे. तर हवामान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने बुधवार व गुरुवारी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला होता. तर आता शुक्रवारीही हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन विभाग नदी काठावरील गावांतील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

९२ टक्के पेरण्या आटोपल्याची नोंद

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर पिकांची लागवड करतात. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर विश्रांती घेतलेल्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी प्रामुख्याने सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा या आजारांची टांगती तलवार असतानाही या पिकासह कपाशी, तूर हेही अंकुरलेले पीक पाण्याअभावी माना टाकत असताना बऱ्यापैकी तग धरून राहिले. तर रुसलेला वरुणराजा आता पुन्हा बरसायला सुरुवात झाल्याने पीक परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा बधून शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी

पावसाची जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थितीचे संकट निर्माण न झाल्याने कुठलाही रस्ता बंद झालेला नाही. पण संततच्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचे वास्तव आहे.

२.१३ लाख हेक्टरवर कपाशी, १.१० लाख क्षेत्रात सोयाबीन पेरा

यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात ४.१८ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या आटोपल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. २.१३ लाख हेक्टरवर कपाशी, १.१० लाख हेक्टरवर सोयाबीन तर ५७ हजार हेक्टरवर तूर पिकांची लागवड झाल्याची नोंद आतापर्यंत कृषी विभागाने घेतली आहे. शिवाय यावर्षी शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर सूर्यफुल व मकाचे उत्पादन खरिपात घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यालाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. पण पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर पाण्याअभावी अंकुरलेली पिके माना टाकत होती. अशातच आता सुरू झालेली पावसाची संततधार या पिकांसाठी सजीवनीच ठरल्याने शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

जलाशयातील पाण्याची टक्केवारी

नांद प्रकल्प : १६.४९

वडगाव प्रकल्प : २४.८१

बोर प्रकल्प : ५७.९९

निम्न वर्षा प्रकल्प : ६३.२०

धाम प्रकल्प : ४९.०७

पौथरा प्रकल्प : १८.९५

पंचधारा प्रकल्प : २६.५१

डोंगरगाव प्रकल्प : ३६.६३

मदन प्रकल्प : २९.९२

लाल नाला प्रकल्प: २९.५५

वर्धा कार नदी प्रकल्प: ५८.०६

सुकळी लघु प्रकल्प : १६.१६

तालुकानिहाय मिमी पाऊस

वर्धा – २७

सेलू – २९

देवळी – २१

आर्वी – २२.०४

आष्टी – १०.०३

कारंजा – १४.२

हिंगणघाट – २८

समुद्रपूर – ३४.६

नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी

Web Title: Wardha rain update yellow alert july rainfall kharif crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Monsoon 2026
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
1

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.