यंदाची दिवाळी धो धो पावसात जाणार! मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून? वाचा एका क्लिकवर (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Weather Update News In Marathi : महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला आहे. तसेच या पावसामुळे पूर परिस्थिती ही निर्माण झाली होती. याचदरम्यान आता मोठी अपडेट समोर येते, यंदाची दिवाळीपण पावसातच साजरी करावी लागणार आहे. मान्सून देशाच्या कोणत्या भागात पोहोचेल याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नियोजित वेळेच्या आधीच भारतात दाखल झालेला मान्सून नियोजित तारखेच्या आधीच परतीचा रस्ता धरला आहे. १४-१५ सप्टेंबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरु केला असून हळूहळू पुढे सरकत आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मान्सूनने गुजरात आणि मध्य प्रदेश व्यापले गाठले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत भारतातून जाण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हंगाम दिवाळीपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात मान्सून १० ऑक्टोबरपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून कर्नाटकात पोहोचला.
मान्सूनमुळे २३-२७ सप्टेंबर दरम्यान ओडिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी बृहन्मुंबई भागातही हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की मंगळवारी पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढणार नाही, परंतु वादळाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. दुर्गापूजेदरम्यान, मुंबई, पुणे आणि राज्यभरात मेघगर्जनेसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे या काळात मुंबईत उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यातील गुरुवारपर्यंत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. ढगाळ हवामान आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे देखील अस्वस्थता निर्माण होऊ शकते.