आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
22 Sep 2025 11:07 AM (IST)
नवरात्रीचा पहिला दिवस देशासाठी आनंददायी ठरला. सोमवार (२२ सप्टेंबर) पासून नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू आता करमुक्त असतील, तर काहींवर फक्त ५ टक्के कर आकारला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, जीएसटी २.० मुळे काही वस्तूंच्या किमतीही वाढतील. त्यांच्या किमती इतक्या जास्त असतील की सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळणार नाही.
22 Sep 2025 10:57 AM (IST)
सामन्यानंतर पत्रकार परिषद सुरू होती. एका पत्रकाराने त्यांना विचारले की यावेळी पाकिस्तानचा संघ अधिक स्पर्धात्मक आहे का? सूर्याचे उत्तर मजेदार होते. पाकिस्तान संघाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधत तो म्हणाला, “मला वाटते की तुम्ही प्रतिस्पर्ध्याबद्दल प्रश्न विचारणे थांबवावे. जेव्हा दोन्ही संघ १५-२० सामने खेळतात आणि एक संघ ८-७ ने आघाडीवर असतो तेव्हा स्पर्धा असते आणि त्याला चांगले क्रिकेट किंवा स्पर्धा म्हणतात. पण जेव्हा निकाल एकतर्फी असतात तेव्हा ते फक्त चांगले क्रिकेट असते.
22 Sep 2025 10:51 AM (IST)
सूरज चव्हाणला त्याच्या आयुष्यातील जोडीदार कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होते. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच सुरज आता लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने स्वतःच ही लग्नाची माहिती शेअर केली आहे.
22 Sep 2025 10:42 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार करता आज २२ सप्टेंबर रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३२० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ९१ अंकांनी कमी होता.
22 Sep 2025 10:37 AM (IST)
न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांतील व्यापारी तणाव, शुल्कवाढ, तसेच व्हिसा धोरणांवरून वाढलेला असंतोष याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
22 Sep 2025 10:33 AM (IST)
मुंबई शहर दोन घटनांनी हादरली आहे. नालासोपारा येथे एका नायजेरियन युवकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर मीरा भाईंदर येथे एका डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनेने मुंबई हादरली आहे. या दोन्ही घटनेचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरु आहे.
22 Sep 2025 10:26 AM (IST)
बॅटलरॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट एक्सक्लूसिवली सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्सना अॅक्सेस करता येत आहे. सर्व प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील गेममध्ये हा ईव्हेंट दिसत नसेल तर चिंता करू नका कारण दोन दिवसांनी तुमच्यासाठी देखील हा ईव्हेंट सुरु होणार आहे.
22 Sep 2025 10:22 AM (IST)
राजकारण आणि व्यावसायिक क्षेत्र यांच्यातील वाद आणि सहकार्य हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्यातील नातेही याला अपवाद नव्हते. कधी हातात हात घालून पुढे जाणारे हे दोघे, तर कधी धोरणांवरून थेट भिडणारे. मात्र, २१ सप्टेंबर रोजीची एक घटना पुन्हा एकदा या दोन्ही प्रभावी व्यक्तींना एकत्र आणताना दिसली.
22 Sep 2025 10:17 AM (IST)
नेपाळच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सोशल मीडियावरील बंदी, आणि Gen-Z पिढीच्या जोरदार निषेधानंतर माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबर रोजी सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत काम करणार आहे. आता, कार्की यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत ५ नवीन चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले आहे. बातमी सविस्तर वाचा...
22 Sep 2025 10:11 AM (IST)
‘जॉली एलएलबी ३’ कमाईच्या बाबतीत हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करत आहे. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षय-अर्शदच्या विनोदी चित्रपटाने आतापर्यंत ५३.५० कोटींची कमाई करून ३ दिवसांत हाफ सेन्चुरी पूर्ण केली आहे. अरशद-अक्षयच्या ‘जॉली एलएलबी ३’ ने पहिल्या दिवशी १२.७५ कोटींची कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने वेग घेतला आणि जबरदस्त कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीही या सुपरहिट फ्रँचायझीने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
22 Sep 2025 10:05 AM (IST)
सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला, तो म्हणाला की सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू त्याला शिवीगाळ करत होते. खरंतर, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की तू इतका शांत दिसतोस, पण फलंदाजी करताना तुला काय होते? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू मैदानावर काही गोष्टी बोलत होते ज्या त्यांनी बोलायला नको होत्या.
गेल्या काही महिन्यांत भारत-अमेरिका संबंधांमध्ये थोडीशी दरी निर्माण झाली आहे. दोन्ही देशांतील व्यापारी तणाव, शुल्कवाढ, तसेच व्हिसा धोरणांवरून वाढलेला असंतोष याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील वाढलेली मतभेदांची दरी भरून काढण्याचा हा एक टप्पा असेल. वाचा अधिक सविस्तर बातमी