मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावरुन खासदार नरेश म्हस्के यांनी शदर पवार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. पवार साहेब खूप मोठे आदरणीय नेते आहेत त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतो असं उपहासात्मक वक्तव्य नरेश म्हस्के यांनी आनंदाश्रम येथे केलं आहे. 12 मार्च 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट झाला तेव्हा पवार साहेब यांनी 13 बॉम्ब स्फोट झाले असं खोटं सांगितलं होतं. काही महिने वर्षानंतर त्यांनी सांगितलं 12 बॉम्बस्फोट झाले होते मी 13 हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी घेतला होता.यावरून पवार साहेब यांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल.
जनतेच्या दरबारात जी काही निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहित आहे म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रात महाराष्ट्राची हास्य जत्रा शो सुरू आहे, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. म्हस्के पुढेअसंही म्हणाले की, लोकसभेमध्ये घटना बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार केला मात्र विधानसभेमध्ये तुमचे डावपेच लोकांच्या लक्षात आले,खोट्या प्रचाराला लोक बळी पडली नाहीत अशी सणसणीत टीका देखील केली आहे.
शरद पवार यांचा काँग्रेस गट आणि महाविकास आघाडी दोन्ही फुटण्याच्या तयारीमध्ये आहेत .त्यांचे आमदार खासदार यांच्याबरोबर राहण्यास तयार नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचं एकमेव उद्योग सुरू आहे.लोकांच्या दरबारात तुम्ही गेला नव्हता का ? इंदिरा गांधी यांच्या काळापासून जो विजय होत होता तो अशा पद्धतीने झाला होता का ? हे त्यांनी जाहीर करावं असा सवाल देखील नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. यासगळ्या प्रकरणामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात वादाचे सूर पुन्हा उमटले आहेत.