
MSRTC Bus Employee News (Photoसौजन्य-सौशलमीडिया)
महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या प्रकरणावर गंभीर आक्षेरप नोंदवल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चालक, वाहक, शिपाई, सहाय्यक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या पदोन्नतीच्या जागा वेळेवर भरल्या गेल्या नाहीत. यामुळे अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष बढतीच्या प्रतिक्षेच्या आहेत. नियमांनुसार नियमितपणे पार पडणे आवश्यक असतानाही काही विभागांमध्ये ती जाणीवपुर्वक लांबण्यात आल्याचा आरोप लावला आहे. (ST Bus:)
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, थेट भरतीसाठी असलेल्या काही रिक्त जागांपैकी २५ टक्के जागा विद्यमान कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नतीद्वारे देण्यात येतात. मात्र गेली काही वर्षे ही प्रक्रिया अनेक विभागांमध्ये रखडल्याने पात्र कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना आवश्यक अनुभव आणि सेवा पूर्ण असूनही त्यांना पुढील पदावर जाण्याची संधी मिळालेली नाही.
बरगे यांनी असा आरोपही केला की, काही विभागांमध्ये ज्येष्ठतेचा निकष बाजूला ठेवून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. काही ठिकाणी नावातील किरकोळ बदल किंवा कागदपत्रांतील तांत्रिक कारणांचा आधार घेत पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज बाजूला करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आणखी एक बाबही चर्चेत आली आहे. एका विभागात पदोन्नती प्रक्रियेबाबत झालेल्या अंतर्गत चौकशीत समितीतील तीन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यापैकी दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली, तर तिसऱ्या अधिकाऱ्याला कोणतीही जबाबदारी न देता निर्दोष घोषित करण्यात आल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. यामुळे चौकशीच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, जर वेळेवर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली असती तर अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सेवाविषयक लाभ मिळाले असते. मात्र प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे अनेकांचे करिअर थांबले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यातील संधींवर झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी आता अधिक जोराने केली जात आहे.
Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
श्रीरंग बरगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कांशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत देऊ नये आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पारदर्शक व्यवस्था उभी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांमुळे एसटी महामंडळातील अंतर्गत प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कर्मचारी वर्गातही नाराजीचे वातावरण असून, लवकरात लवकर निर्णय घेऊन रखडलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे कोणत्या भूमिकेतून पाहते आणि चौकशीचे पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.