Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar power project : एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी – परिवहनमंत्र्यांची माहिती

एसटी महामंडळाने सौर ऊर्जेकडे वाटचाल करत पहिला टप्पा सुरू केला असून 2.57 मेगावॉट क्षमतेच्या ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एसटीच्या ऊर्जाखर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळणार...

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2026 | 07:03 PM
एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Follow Us
Follow Us:
  • एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू
  • 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी
  • परिवहनमंत्र्यांची माहिती
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा, कार्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढणार असून, दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Mumbai Atal Setu : मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट! अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरला वेग

प्रमुख प्रकल्प: एमएसआरटीसीने बस डेपो, कार्यशाळा, बस स्थानके आणि प्रशासकीय कार्यालयांच्या छतांवर सौर पॅनेल बसवणार आहे.

पहिल्या टप्प्याला मंजुरी: महाराष्ट्र सरकारने २.५७ मेगावॅट क्षमतेच्या ग्रिड-कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे, जो महाराष्ट्रभरातील एमएसआरटीसीच्या विविध केंद्रांवर स्थापित केला जाईल.

मोठे लक्ष्य (३०० मेगावॅट): अहवालानुसार, एकूण ३०० मेगावॅट (MW) सौर ऊर्जा निर्माण करण्याचे एमएसआरटीसीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

आर्थिक लाभ: या प्रकल्पामुळे वीज खर्चात दरवर्षी अंदाजे ₹१,००० कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. या उपक्रमामुळे महामंडळाचे सरकारी अनुदानावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

अंमलबजावणी: हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारांच्या नवीकरणीय ऊर्जा योजनांचा वापर करून सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत राबविण्यात येईल.

इलेक्ट्रिक बस ताफा: हा उपक्रम एमएसआरटीसीच्या वाढत्या इलेक्ट्रिक बस ताफ्यासाठी हरित ऊर्जा प्रदान करेल.

Kalyan News : प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने यांचं पुस्तक प्रकाशन; नीलकांचनच्या प्रकाशन सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

Web Title: Msrtc solar energy project 2 57 mw grid approval pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • Solar Project

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
3

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
4

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.