Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: कचरा निर्मूलनासाठी ‘मुंबई क्लीन लीग’वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना न

मुंबईतील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून 'भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे वॉर्ड मॅप तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 11:45 AM
कचरा निर्मूलनासाठी 'मुंबई क्लीन लीग'वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना निर्देश

कचरा निर्मूलनासाठी 'मुंबई क्लीन लीग'वर भर! नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे कर्मचाऱ्यांना निर्देश

Follow Us
Follow Us:

मुंबई महापालिका क्षेत्र अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता नागरिक, सेवाभावी संस्था आणि ‘टीआयएसएस’ सारख्या नामांकित संस्थांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची व्यवहार्यता तपासून त्यांची अंमलबजावणी करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी दिले. कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन ही ‘त्रिसूत्री’ अधिक बळकट करण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी पहाटे शहर आणि पूर्व उपनगरातील वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरातील स्वच्छता चौक्यांना आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

वडाळा पूर्व येथील बरकत अली दर्गा मार्ग आणि अरुणकुमार वैद्य मार्ग येथे रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली बेवारस वाहने आणि अस्वच्छतेबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. ही वाहने हटवण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

सूक्ष्म नियोजनासाठी ‘जीआयएस’चा वापर

मुंबईतील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून ‘भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे वॉर्ड मॅप तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.प्रत्येक रस्त्यावरील कचरा संकलनाचा आराखडा तयार करून एक मॉडेल विकसित करावे आणि ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवावी, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

घनकचरा व्यवस्थापन हे केवळ प्रशासकीय काम नसून तो नागरी सहभागाचा विषय आहे, असे मत आयुक्त भिडे यांनी व्यक्त केले.स्वच्छ मुंबई अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘इंटर्नशिप प्रोग्राम’ (आंतरवासीता उपक्रम) राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.गृहनिर्माण संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी सतत संवाद साधून त्यांना या मोहिमेत सक्रिय करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपआयुक्त प्रशांत सपकाळे, किरण दिघावकर, संध्या नांदेडकर, प्रशांत गायकवाड आणि विविध विभागांचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai focuses on clean league to tackle waste commissioner ashwini bhide urges innovative ideas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • Garbage Issue
  • Mumabi

संबंधित बातम्या

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त
1

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.