धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा (फोटो सौजन्य : iStock)
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी याप्रकरणी उपस्थित केला आहे.
मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या संकटांच्या अडकलेल्या आर्थिक विळख्यात शेतकऱ्यांसमोर अडचणींसह मानसिक तणावाचाही मोठा डोंगर उभा राहतो. आणि त्यातून अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. शासनाकडून कर्जमाफी, मदत पॅकेज व विविध योजनांची घोषणा होते. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ वेळेत व प्रभावीपणे पोहोचत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते.
Kolhapur News : शिक्षकांना ऑनलाईन कामाचा अतिरिक्त ताण; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जाच घसरल्याची खंत
दरम्यान, वडेट्टीवार यांनी भाजप नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधींवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली होती. ज्यांना परकीय सत्तांसमोर लोटांगण घालण्याचा वारसा लाभला आहे, ते कोणत्या तोंडाने बोलतात? असा प्रश्न तावडेंनी राहुल गांधीच्या संघावरील टीकेला प्रत्युत्तर देताना उपस्थित केला होता. वडेट्टीवार म्हणाले होते, स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा कुठेही सहभाग नव्हता, ज्यांची विचारसरणीच परकीय सत्तेसमोर नतमस्तक होण्यात वाढली, त्यांनी काँग्रेसला प्रश्न करणे म्हणजे इतिहासाचाच अपमान आहे.
सरकारकडून केवळ घोषणाच, लाभ नाही : वडेट्टीवार
आत्महत्या थांबवण्यात सरकार अपयशी आहे. सोशल मीडियातील आपल्या एका पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यात अवघ्या तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. कर्जाचा बोजा आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. रक्ताचं पाणी करून जगाला पोसणारा अन्नदाता आज स्वतःच्याच शेतात फासावर लटकतोय, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
खरीप हंगामापूर्वीच अडवणूक
खत कंपन्यांकडून लिंकिंगची शेतकऱ्यांना होणारी सक्ती यावरून गडहिंग्लज पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. खत लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? अशी विचारणा पंचायत समिती सदस्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात एकीकडे रासायनिक खांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता खत विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने खळबळ उडाली आहे.






