Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबई महापालिकेचा ‘एआय’ दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

कंत्राटदारांना गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे ३० सेकंदांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. या डेटाची संगणकीय तपासणी केली असता कंत्राटदारांचे गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 11:00 AM
मुंबई महापालिकेचा 'एआय' दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

मुंबई महापालिकेचा 'एआय' दणका! नालेसफाईत लबाडी करणाऱ्या कंत्राटदारांना सव्वा नऊ कोटींचा दंड, थेट बिलातून वसुली

Follow Us
Follow Us:

नालेसफाईच्या कामात चालढकल आणि हेळसांड करणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेने तंत्रज्ञानाचा वापर करून आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. नालेसफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीने कंत्राटदारांचे अनेक गैरप्रकार आणि चुका रंगेहाथ पकडल्या आहेत. याप्रकरणी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दणदणीत दंड ठोठावला असून, ही दंडात्मक रक्कम थेट कंत्राटदारांच्या बिलांमधून (देयके) कापून घेण्यास सुरुवात केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: मुंबईतील व्यापाऱ्यांकडून मराठीचे जोरदार स्वागत! नियम मोडणाऱ्या १,१२४ दुकानांना पालिकेचा दणका; प्रभावी अमलबजावणीवर भर

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कडक निर्देशानंतर पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही धडक कारवाई केली आहे. नालेसफाईच्या कामात पूर्ण पारदर्शकता असावी यासाठी पालिकेने प्रगत एआय प्रणाली विकसित केली आहे. कंत्राटदारांना गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे ३० सेकंदांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. या डेटाची संगणकीय तपासणी केली असता कंत्राटदारांचे गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.

नालेसफाईच्या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत पालिका प्रशासन कमालीचे आग्रही आहे. यामध्ये जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने झालेली कोणतीही चूक अक्षम्य आहे. प्रशासनाचे यावर ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहिष्णुता) धोरण असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, हाच संदेश या कारवाईतून दिला आहे. यापुढेही त्रुटी आढळल्यास पालिका आणखी टोकाचे पाऊल उचलेल, अभिजीत बांगर,अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांनी अशी भूमिका मांडली आहे.

Mumbai News : पूर रोखण्यासाठी मोठी तयारी; रेल्वे मार्गांवर पंप, मायक्रो टनेल आणि नालेसफाईचा आढावा

प्रतिमांमध्ये विसंगती, अनेक आढळल्या त्रुटी

कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाचे वजन करताना वजनात फेरफार करण्यासाठी गाडीवरील ताडपत्री न हटवणे, आधीच केलेल्या कामाचे जुने फोटो पुन्हा वापरणे किंवा प्रतिमांमध्ये विसंगती असणे, कागदपत्रांवरील नोंदणीकृत वाहने किंवा वर्ककोड आणि प्रत्यक्ष जागेवर काम करणारी वाहने यांमध्ये ताळमेळ नसणे अशा त्रुटींचा समावेश आहे. याशिवाय नालीतील गाळ नेमका कुठे नेऊन टाकला याचा व्हिडिओ अपलोड न करणे, आवश्यक फोटो उपलब्ध न करणे, कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्री, क्रेन आणि वाहनांची अपुरी उपलब्धता असणे, कामगारांना सुरक्षा साधने न देणे आणि संथ गतीने काम करणे अशा विविध प्रकारच्या त्रुटी ए. आय. प्रणालीने शोधून काढल्या आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai municipal corporations ai crackdown contractors cheating on drain cleaning fined 9 25 crore mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Monsoon Alert
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
1

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
2

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
3

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
4

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.