Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात तापमानाचा उच्चांक अनुभवायला मिळू शकतो. काही ठिकाणी पारा ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 09:56 AM
राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांनाही उन्हाचा चटका
  • अनेक ठिकाणी पावसाची नोंद नसल्याने उष्णतेचा प्रभाव कायम
  • मुंबईकरांना उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवणार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातारणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऑक्टोबरच्या मध्यावरच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, रत्नागिरी येथे सोमवारी राज्यातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऑक्टोबरमधील उन्हाची तीव्रता लक्ष वेधून घेत आहे. वैशाख महिन्यात जाणवणारा वणव्याचा चटकाही फिका पडावा, अशी परिस्थिती काही भागांत निर्माण झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, नंदुरबार येथे ३८.९ अंश, हर्णे येथे ३८.५ अंश, मालेगाव येथे ३८.४ अंश, तर मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात तापमानाचा उच्चांक अनुभवायला मिळू शकतो. काही ठिकाणी पारा ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रत्नागिरीत तापमान सर्वाधिक 39.2 अंशांवर गेले आहे. ठाणे-बेलापूर येथे ३८ अंश, तर सोलापूरमध्ये ३७.९ अंश तापमानाची नोंद झाली. जळगावमध्येही पारा ३७.४ अंशांवर पोहोचला. मात्र, दिवसा तापमान कमी होऊ लागले तरी आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वोच्च कमाल तापमान असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आले आहे.

अनेक ठिकाणी पावसाची नोंद नसल्याने उष्णतेचा प्रभाव कायम

मुंबईच्या कुलाबा केंद्रात ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली नसल्याने उष्णतेचा प्रभाव कायम आहे. ऑक्टोबरमध्येही तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशांच्या आसपास पोहोचत असल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. हर्णे येथे १२ ऑक्टोबर रोजी कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

मुंबईकरांना उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवणार

ऑक्टोबरच्या मध्यावर मुंबईकरांना उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात १३ आणि १४ ऑक्टोबरला कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

राज्यातून मान्सून माघारी फिरल्यानंतर आता ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचे संकेत मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजाच्या नकाशानुसार, २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसत आहे.

Web Title: Significant rise in temperatures across maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Climate Change
  • Mumbai News
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News: औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे
1

Mumbai News: औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
2

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
3

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त
4

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.