माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश (फोटो सौजन्य-एएनआय)
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत विविध चर्चांना उधाणं आले होते. मात्र हे चित्र स्पष्ट झाले असून आज (25 जून) सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्याचवेळी महायुतीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीनं ३० जागांवर विजय मिळवला तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. या निवडणूकीत भाजपला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. आता भाजपनं आपलं लक्ष विधानसभा निवडणूकीवर केंद्रीत केलं आहे. सूर्यकांता पाटील यांनी अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. 2014 मध्ये त्या पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निवेदन देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने गेल्या दहा वर्षांत सूर्यकांता पाटील यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पक्ष नाराज असल्याची चर्चा सरकारी वर्तुळात रंगली होती. अशातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.