Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Taxi in Mumbai : मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई शहरातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. अशातच आता राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत नवीन जलटॅक्सी सेवा सुरू होणार आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2025 | 06:14 PM
मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना सूचना (फोटो सौजन्य-X)

मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना सूचना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवरीव वाढता ताण पाहता ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यासोबतच गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

‘गद्दार’ रवींद्र वर्माला ‘इतक्या’ दिवसांची कोठडी; पाकिस्तानला पुरवत होता सैन्यदलाची महत्वपूर्ण माहिती

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक नितेश राणे यांनी सांगितले की, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना फायदा होणार

कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाने सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेशात २१ ठिकाणे ओळखली गेली आहेत जिथे जेट्टी बांधल्या जातील. पहिल्या टप्प्यात १५ जेट्टी बांधल्या जातील. मत्स्यव्यवसाय विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात खत जेट्टीचे काम केले जाईल. या वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल.

Thane News : गौतम अदानींच्या फोटो मारले जोडे ; महावितरण प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक

Web Title: Mumbai water taxi will start soon minister nitesh rane informed about major decisions important order to government officials maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Mumbai
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.