रवींद्र वर्माला पोलिस कोठडी (फोटो- istockphoto)
ठाणे: पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कळवा येथून रवींद्र वर्माला अटक केली होती. रवींद्र वर्मा मुंबईच्या नेव्हल डॉकची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज रवींद्र वर्माला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने रवींद्र वर्माला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ठाणे जिल्हा कोर्टाने रवींद्र वर्माला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवींद्र वर्माने नेव्हल डॉक सारख्या महत्वाच्या ठिकाणची माहिती पाकिस्तानला पुरवून देशाशी गद्दारी का केली? पैशांसाठी की त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले होते याबाबतची चौकशी पोलिसाना करायची आहे.
रवींद्र वर्माने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील ठिकाणचे आराखडे सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. रवींद्र वर्माने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला १४ पाणबुड्या , जहाजे आणि बेटांची माहिती पुरवली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. रवींद्र वर्मा हनीट्रॅपमध्ये अडकला असल्यामुळे तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र ATS ची पथके थेट ठाण्यात घुसली
हलगाम हल्ला झाल्यानंतर देशभरात सगळीकडेच दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात देखील एटीएसने मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यात ही मोठी कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र एटीएस इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियाशी सबंधित कथित दशतवाद्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ही कारवाई केली आहे. पडघा या भागात ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र दशतवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. एटीएसची पथके इसिससही संबंधित असणाऱ्या साकीब नाचणच्या व अन्य संशयितांच्या घरावर देखील छापेमारी केली जात आहे.
महाराष्ट्र ATS ची पथके थेट ठाण्यात घुसली अन्…; वेगवान सर्च ऑपरेशन सुरू, नेमके प्रकरण काय?
सध्या ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती एटीएसने दिलेली नाही. मात्र या कारवाईमुळे सरकारने दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहे. साकीब नाचण या आधी दोन दहशतवादी प्रकरणात दोषी ठरला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले, मूलुंड येथील बॉम्बस्फोटात तो सहभागी असलत्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सध्या महाराष्ट्र एटीएस पडघा भागातील बोरिवली गावात मोठे सर्च ऑपरेशन राबवत आहे. त्यामुळे ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्याकडून कोणती माहिती एटीएसला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या कारवाईत अजून अजून काय घडामोडी घडतात हे देखील पहावे लागणार आहे.