Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, संबंधित व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 02:41 PM
मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; बचावकार्य युद्धपातळीवर

मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; बचावकार्य युद्धपातळीवर

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना
  • साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
  • महापालिकेची पोलखोल
Sakinaka Manhole Incident News Marathi : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर गुरुवारी (2 जुलै 2026) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला आहे. अस्लम शेख असे ५५ वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी यासंदर्भात माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करत होते.

पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दादर, प्रभादेवी, माटुंगा, सायन, अंधेरी, मुंब्रा, नालासोपारा, कळंबोलीसह अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अशा परिस्थितीत साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आता मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने पावसाळ्यातील सुरक्षाव्यवस्थेवर टीका होत आहे.

पावसात पाणी साचल्याने कार्यालयात जाणे अशक्य झाल्यामुळे अस्लम शेख घरी माघारी फिरण्याच्या तयारीत होते. यावेळी अंधेरीतील साकीनाका परिसरात खैरानी रोडवर असलेल्या सन्मान हॉटेलच्या समोर असलेल्या मॅनहोलजवळ आले असताना, पावसाच्या पाण्यामुळे त्यांना मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे ते एका उघड्या जागेत पडले. त्यानंतर ते वाहत जाऊन १० ते १५ फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलजवळ दिसले.

हेल्मेट सक्तीचा नियम सर्वांसाठी नाही! ‘या’ नागरिकांना कायद्यातून विशेष सूट; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

मॅनहोलचे झाकण उघडे असल्याची प्राथमिक माहिती

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मॅनहोलशी संबंधित काम सुरू असल्याने त्याचे झाकण उघडे होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उघडा मॅनहोल दिसून न आल्याने संबंधित व्यक्ती त्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.

अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष बचाव पथकाच्या मदतीने मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन तब्बल चार तासानंतर मृत्यू व्यक्तीला बाहेर काढण्यात आले.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे, उघड्या मॅनहोलपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस

Web Title: Mumbai sakinaka man falls into open manhole rescue operation underway news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Monsoon Update
  • Mumbai
  • Rain News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
4

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.