Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 09:02 PM
राज्यात पावसाचा जोर वाढणार! 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट (Photo Credit- X)

राज्यात पावसाचा जोर वाढणार! 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पावसाचा जोर वाढणार!
  • ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
  • ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांसाठी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट

हवामान विभागाने पालघर आणि पुणे जिल्ह्यांतील घाट क्षेत्रांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Thunderstorm accompanied with lightning, gusty winds 40-50 kmph, light to moderate rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/jFNr2GzG0C
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 2, 2026

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

IMD च्या मते, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. २ आणि ३ जुलै रोजी या भागांत मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, ४ ते ६ जुलै दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भ भागात सतत पाऊस पडत आहे. बुधवारी संध्याकाळी नागपूर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ६ जुलैपर्यंत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत सतत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, ज्यामुळे स्थानिक नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील हवामानाचा अंदाज

मराठवाड्यात शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर इतर दिवशी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ४ जुलैपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचीही शक्यता आहे.

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Web Title: Rainfall intensity to increase in the state these districts under red and orange alerts warning of extremely heavy rainfall until july 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • imd
  • Maharashtra Rain
  • Mansoon session
  • Marathwada
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
4

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.