Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

दुष्काळस्थितीत सरकारने आमदार स्थानिक विकास निधीतून उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. २०२६-२७ या वर्षात प्रत्येक कामासाठी २५ लाखांची कमाल आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कामांना जिल्हाधिकारी मंजूरी देऊ शकणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2026 | 07:50 AM
राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Follow Us
Follow Us:

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीसाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात जलसंपदा विभागाने पुढील ३१ ऑगस्टपर्यंतचे पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केले आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सर्वोच्च प्राधान्य असून, 16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.

धरणे व जलाशयांमधील पाणी नियोजनात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असेल. बाष्पीभवन, गाळ व अनधिकृत उपसा विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवले जाईल. तसेच भविष्यातील अनिश्चितता र्वभूमीवर पाहून प्रत्येक धरणात १० टक्के आपत्कालीन बफर साठा राखीव असेल. निकडीच्या वेळी तांत्रिक तपासणी करून मृतसाठ्यातील पाणी वापरले जाईल. शेती व सिंचन नियोजन पिण्याचे पाणी, जनावरे व चाऱ्याची गरज भागल्यानंतर उर्वरित पाण्याचे सिंचनासाठी वाटप होईल.

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

दरम्यान, प्रथम रबी हंगामातील भुसार व चारा पिके, त्यानंतर इतर पिकांना आणि शिल्लक राहिल्यास बारमाही पिकांना मंजुरी असेल. अपव्यय टाळणाऱ्या सिंचन पद्धतींवर भर दिला जाईल.

उपाययोजनांना मंजुरी

दुष्काळस्थितीत सरकारने आमदार स्थानिक विकास निधीतून उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. २०२६-२७ या वर्षात प्रत्येक कामासाठी २५ लाखांची कमाल आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कामांना जिल्हाधिकारी मंजूरी देऊ शकणार आहेत. उपाययोजनांना पूरक म्हणून आमदार निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नियोजन विभागाने ५ रोजीच्या शासन निर्णयातून घेतला आहे.

वीजपंप बसवण्याची कामे लवकरच

या निधीतून तात्पुरत्या नळ योजना, नळजोडणी, पाइपलाईन व टाक्या दुरुस्ती, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विहिरी व ट्यूबवेल, विहिरींची दुरुस्ती व पुनरुज्जीवन तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी वीजपंप बसवण्याची कामे करता येतील. नदीपात्रात बुडक्या घेणे आणि तात्पुरती पाणीसाठवण व्यवस्था उभारण्यासही परवानगी आहे. २५ लाखांवरील खर्चाचे प्रस्ताव कलेक्टरनी विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश आहेत.

उद्योगांसाठी 30 टक्के पुनर्वापर

औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. धरणे, नद्या व कालव्यांतून अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदाची संयुक्त पथके गस्त घालतील. दोषींवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाईल.

चारा छावण्या, गोशाळा, शाळांनाही निधी

चारा छावण्यांमध्ये बादल्या व टब, अधिकृत गोशाळांत शेड उभारणी आणि पाण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची कामेही निधीतून करता येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाणी देण्यासाठी साहित्य तसेच शाळांत जलशुद्धीकरण यंत्रणानांही मंजुरी आहे.

हे सुद्धा वाचा : २०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

Web Title: 10 percent water cut in all local government bodies across the state starting october 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Water Crisis
  • Water Issue
  • Water Shortage

संबंधित बातम्या

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
1

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
2

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
3

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
4

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.