• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • 13 Lakh Square Feet Of Commercial Space Distributed At Stations Of Metro 3 By Mmrc

MMRC द्वारे मेट्रो-३ च्या स्थानकांवर १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा वितरित

प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई मेट्रो नेहमीच आपल्या सुविधा वाढवण्याच्या तयारीत असतात. आता MMRC ने मेट्रो लाईन-३च्या २७ स्थानकांवर सुमारे १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा यशस्वीरित्या वितरित केल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2025 | 08:47 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) ने मेट्रो लाईन-३च्या २७ स्थानकांवर सुमारे १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा यशस्वीरित्या वितरित केल्या आहेत. या जागा विविध व्यावसायिक उद्देशांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ज्या खाद्य व पेय (फूड अँड बेव्हरेज), रिटेल, बँक एटीएम आणि व्हेंडिंग मशीन यांसारख्या क्षेत्रांमध्ये वापरल्या जातील.

वितरित जागांमध्ये मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून ते लहान छोट्या दुकानांपर्यंत विविध प्रकारची जागा उपलब्ध आहे. सुमारे ४०,००० चौरस फुटांच्या मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून १०० चौरस फुटाच्या लहान दुकानांचा समावेश आहे, जे विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.

20th Tata Mumbai Marathon : प्रत्येक मैल धैर्याने पार करा; अंतिम लक्ष्य नक्की गाठाल; सर मो फराह यांचा खेळाडूंना सल्ला

या व्यावसायिक जागा MMRC च्या खुल्या निविदा प्रक्रियेने वितरित केल्या जात आहेत, ज्यामुळे अधिक प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाश्यांना विविध सेवा आणि सुविधा मिळविण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत. MMRC ने हे सुनिश्चित केले आहे की या जागा उच्च मानकांच्या आणि ग्राहकांच्या गरजांनुसार डिझाइन केलेल्या असतील.

या निविदांमध्ये टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी, नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स, आणि चितळे बंधू यांसारख्या प्रमुख उद्योगसमूहांनी भाग घेतला होता. या व्यावसायिक जागा मेट्रो-३ स्थानकांच्या महत्त्वाच्या जागी असल्याने व भविष्यात या मार्गावरील वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या द्वारे प्राप्त होणाऱ्या महसुलामुळे जायकाचे कर्ज फेड करण्यास व मेट्रो-३ कार्यान्वयनाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

Mumbai Crime : ‘त्या’ दोघींना जंगलात नेलं अन्..; अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

नॉन फेअर रेव्हेन्यू संदर्भातील कामांचे व्यवस्थापन ऑक्टस अ‍ॅडव्हायजर्स या सल्लागार कंपनीकडून केले जात आहे. याविषयी एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे म्हणाल्या की “भाडे उत्पन्नाच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून मिळणारी कमाई मेट्रोचे तिकिट दर वाजवी ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल, ज्यामुळे मेट्रो प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल व मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर वाढेल. पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यास मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि राहणीमानचा दर्जाही उंचावेल.”

Web Title: 13 lakh square feet of commercial space distributed at stations of metro 3 by mmrc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai Metro
  • Mumbai metro 3

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.