Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण

भांडुप विधानसभा क्षेत्रातील डोंगराळ भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला जाब विचारत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 02:45 PM
Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण

Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:
  • भांडुपमधील डोंगराळ भागांमध्ये कमी दाबामुळे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
  • लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनावर केवळ आश्वासनांची मालिका सुरू ठेवल्याचा आरोप करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
  • स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण आणि विशेष तांत्रिक उपाययोजना राबवण्याची मागणी जल अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याप्रश्नी पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा तसेच प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाचत नुकतीच वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.

पालिकेकडून केवळ आश्वासन, नागरिकांचा संताप

भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा आश्वासनाचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.

आता विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचे डिजिटल ‘रूपे कार्ड’; सवलतीच्या दरात तिकीट मिळणार

उंच भागातील वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई

विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच डोंगराच्या पायथ्याशी भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bhandup water crisis deepens residents demand immediate action over low pressure supply in hilly areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Bhandup
  • NAVARASHTRA
  • Water Crisis

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे
1

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली
2

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: 15 दिवसांनी अवघा अर्धा तास पाणी! न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; आंदोलनाचा इशारा

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी
4

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.