Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandup Bus Stand Accident: भांडुप बसस्थानक की ‘मृत्यूचा सापळा’? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म; पुन्हा अपघाताने नागरिक संतप्त

भांडुप पश्चिम बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक संतप्त. खासदार संजय दिना पाटील यांनी बस डेपो स्थलांतरित करण्याची आणि लहान बसेस सुरू करण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 09:25 PM
भांडुप बसस्थानक की 'मृत्यूचा सापळा'? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म

भांडुप बसस्थानक की 'मृत्यूचा सापळा'? ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म

Follow Us
Follow Us:

 

  • भांडुप बसस्थानक की ‘मृत्यूचा सापळा’?
  • ४ बळींनंतरही प्रशासन ढिम्म
  • पुन्हा अपघाताने नागरिक संतप्त
मुंबई, नीता परब : भांडुप पश्चिम येथील बसस्थानक परिसर अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही बेस्ट आणि पालिका प्रशासन अजूनही गाढ झोपेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रविवारी पुन्हा एकदा बस रिव्हर्स घेताना रेल्वे तिकीट विक्री स्टॉलला धडक बसून अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी टळली, कारण याच ठिकाणी चार महिन्यांपूर्वी चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे आणि तरीही प्रशासन मात्र मूग गिळून असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या निर्लज्ज निष्क्रियतेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून अजून किती नागरिकांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल आता थेट अधिकाऱ्यांना केला जात आहे.

दरवेळी अपघात झाला की चौकशी, पाहणी, आश्वासने आणि नंतर पुन्हा सगळे पूर्ववत! हीच प्रशासनाची पद्धत बनली आहे. दोन महिन्यांपूर्वीच सदर बस स्थानक परिसराची पाहणी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे लाेकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी पुरेसा अनुभव नसलेल्या चालकांकडून बस चालवली गेली आणि झालेल्या अपघातात चार लोकांचा बळी गेला. नागरिकांच्या जीवाशी प्रयोग करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? असा सवाल भांडुपकर करत आहेत.

सहा मीटरच्या लहान बसेस चालविण्यात याव्यात -नागरिकांची जाेरदार मागणी

अरुंद रस्ते, डोंगराळ भाग आणि प्रचंड वाहतूक काेंडी यामुळे मोठ्या बस वळवणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे, सहा मीटरच्या लहान बसेस चालविण्याबाबत यापूर्वी वरिष्ठ अधिकारी व लाेकप्रतिनिधींमध्ये चर्चा झाली हाेती तरीही प्रशासन आठ-नऊ मीटरच्या मोठ्या बसेसच चालवण्याचा हट्ट करत आहे असा सवाल केला जात आहे. यामागे आर्थिक गणिते आहेत का? अशी जाेदरार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. एकीकडे, स्टेशन परिसरातील पोलीस बीट, बेस्ट बीट आणि नव्याने उभारलेली महानंदाची टपरी हे सर्व मिळून रस्त्याला अडथळ्यांचे जाळे बनले आहे. नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. मग बस चालक सुरक्षितपणे वाहन कसे चालवणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. स्टेशन परिसरात रिक्षाची गर्दी होऊ नये म्हणुन वाहतूक पोलिसांनी सीमारेषा आखून दिली असतानाही रिक्षाचालक सर्रास नियम मोडून स्टेशन परिसरात घुसतात. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेणे, रेषेबाहेर उभे राहणे सगळे खुलेआम सुरू आहे. पण कारवाई मात्र शून्य! पाेलीसांच्या या नियमाबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

BMC News: मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

बस डेपाेचे स्थालांतर हाेणे गरजेचे; पर्यायी जागा उपलब्ध

खासदार संजय दिना पाटील यांनी बस डेपो स्थलांतराची स्पष्ट मागणी केली होती. स्टेशनजवळील पार्किंग जागा किंवा ड्रीम्स मॉल परिसराचा पर्यायही सुचवला होता. मात्र प्रशासनाने या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. परिणामी आज पुन्हा अपघात झाला म्हणजेच प्रशासनाच्या निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत की बस डेपो तातडीने स्थलांतरित करावा, मोठ्या बसेस बंद करून लहान बसेस सुरू कराव्यात, परिसरात असलेल्या दुकानांचे अडथळे तातडीने हटवावेत, नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. भांडुप पश्चिम बसस्थानकातील परिस्थिती ही केवळ प्रशासनाच्या अपयशाची नाही, तर पूर्णपणे निष्िक्रय आणि बेफिकीर यंत्रणेची जाहीर कबुली आहे. प्रत्येक अपघातानंतर आश्वासने देणे आणि पुन्हा दुर्लक्ष करणे हा खेळ आता नागरिक सहन करणार नाहीत. आणखी किती अपघात आणि किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा प्रश्न खा. संजय दिना पाटील यांनी केला आहे.

Web Title: Bhandup west bus stand accident crisis public outrage mini bus demand 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Bhandup
  • Bus Accident
  • Mumbai

संबंधित बातम्या

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप
1

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
2

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
3

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Dubai-Mumbai इंडिगो विमानात धुराचा अलर्ट; राजकोटमध्ये थरारक इमर्जन्सी लँडिंग, इंडिगोचे स्पष्टीकरण आले समोर
4

Dubai-Mumbai इंडिगो विमानात धुराचा अलर्ट; राजकोटमध्ये थरारक इमर्जन्सी लँडिंग, इंडिगोचे स्पष्टीकरण आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.