Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा: कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
शनिवारी रात्री मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’चा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य: X)
#WATCH | Mumbai, Maharashtra | Two dead and five injured after a massive Ganesh Idol of Bhuleshwar Cha Raja fell during its arrival procession at the Balaram Merchant Road in the Bhuleshwar area. The names of the deceased are Sanket Nevshe, 33 years, and Brijesh Hemant Joshi,… pic.twitter.com/QMOC0Y1oLr — ANI (@ANI) August 22, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, भुलेश्वरचा राजा मंडळाने शनिवारी रात्री भुलेश्वरचा राजा’चा आगमन सोहळा आयोजित केला होता. यावेळी मंडळाची 22 फुटांची गणेशमूर्ती भायखळ्यापासून भुलेश्वर येथे आणली जात होती. मात्र मंडळाच्या मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर गणेशमूर्ती कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. मूर्ती कोसळल्यानंतर त्याखाली काही लोक अडकल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दल, पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. तसेच, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत 2 लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुली असल्याचे सांगितले जात आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्ती अचानक कशी कोसळली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






