Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धारावीकरांसाठी मोठा दिलासा! नव्या घरांचा हक्क रहिवाशांकडेच राहणार; अफवांना अधिकाऱ्यांचा चाप

माटुंगा येथे रेल्वेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमधील घरांवर रहिवाशांचाच हक्क राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, अफवांवर पडदा पडत धारावीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 23, 2026 | 10:09 AM
(फोटो सौजन्य- गुगल)

(फोटो सौजन्य- गुगल)

Follow Us
Follow Us:
  • धारावीकरांसाठी दिलासादायक बातमी
  • पुनर्विकासातील घरांवर पूर्ण मालकी हक्क कायम
  •  रेल्वेच्या जागेवरील घरांबाबत अफवा आणि सत्य
माटुंगा येथे रेल्वेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमधील घरांवर धारावीकरांचाच पूर्ण मालकी हक्क राहणार असल्याची महत्त्वाची माहिती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. घरांच्या मालकी हक्काबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे.अधिकाऱ्यांच्या या स्पष्टिकरणामुळे प्रकल्पासंबंधी सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार असून धारावीकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्पातील प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून, नव्या घरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. मात्र, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही मोजक्या लोकांकडून अफवा पसरवून स्थानिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

‘नवी घरे रेल्वेच्या जागेवर उभारली जाणार असल्याने धारावीकरांना त्या घरांवर मालकी हक्क मिळणार नाही’ अशी अफवा मागील काही दिवसांपासून पसरवली जात होती. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दाव्यांचे स्पष्ट खंडन केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा परिसरातील सुमारे 45 एकर जागा रेल्वे प्राधिकरणाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिली आहे. यासंदर्भात रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) आणि संबंधित प्राधिकरणांमध्ये कायदेशीर करार करण्यात आला आहे.या करारानुसार, संबंधित जमीन गृहनिर्माण संस्थांना सब-लीजवर देता येणार आहे. त्यामुळे जमीन रेल्वेच्या मालकीची असली तरी प्रकल्प राबवणारी संस्था प्राथमिक भाडेकरू (प्रायमरी लीज होल्डर) असेल, तर नव्याने स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्था या सब-लीज होल्डर असतील.यामुळे, पुनर्वसन इमारतींमध्ये मिळणाऱ्या घरांवर धारावीकरांचा हक्क अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये पसरलेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून, प्रकल्पासंबंधीचा वादही आता शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांप्रमाणे, धारावीकरांना देखील त्यांच्या नव्या घराचा मालकी हक्क मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार, 5 वर्षांच्या लॉक इन कालावधीनंतर सदर घरांची खरेदी-विक्री करता येईल किंवा घर तारण ठेवून कर्जही घेता येईल” असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis: “लज्जास्पद आणि अशोभनीय”, मल्लिकार्जुन यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

राज्य सरकारने 2012 मध्ये भाडेकराराबाबतच्या धोरणात बदल करून, दीर्घ मुदतीच्या भाडेकराराचा कालावधी 99 वर्षे किंवा 50 वर्षांवरून कमी करून 30 वर्षांचा केला आहे. तेव्हापासून म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांसारख्या प्राधिकरणांकडून 30 वर्षांचा भाडेकरार करण्यात येतो. शासनाच्या धोरणानुसार, माटुंगा येथील रेल्वेची जागा, तिथे होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना 30 वर्षांच्या भाडे करारावर देण्यात येईल. तसेच, या कालावधीनंतर हा भाडेकरार वाढविण्याची तरतूदही या धोरणात असल्याने, रहिवाशांचा त्यांच्या घरावरील मालकी हक्क अबाधित राहू शकेल.

Mumbai-Pune Expressway Megablock : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वास्तविक,अशा पद्धतीने भाडेपट्ट्यावरील जागेत याआधीही मुंबईत अनेक इमारती उभारण्यात आल्या आहेत. मुंबईत आजही अशा अनेक इमारती अस्तित्वात आहेत. सुमारे 40 -50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारतींच्या भाडेकराराची मुदत नियमानुसार वाढविण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष हेतू प्रकल्प (एसपीव्ही), म्हणजेच एनएमडीपीएलकडून भाडेकराराची रक्कम एसआरए/डीआरपीकडे हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर ही रक्कम रेल्वेच्या आरएलडीएकडे सुपूर्द करण्यात येईल.

पुनर्विकासातील घरांवर पूर्ण मालकी हक्क कायम

धारावी पुनर्विकास प्रकल्पात प्रत्येक पात्र कुटुंबाला हक्काचे घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, या घरांची कायदेशीर मालकी धारावीकरांकडेच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे घरांच्या मालकी हक्काबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

चौकट: रेल्वेच्या जागेवरील घरांबाबत अफवा आणि सत्य

अफवा 1: या घरांचा मालकी हक्क मिळणार नाही
सत्य: घरांचा मालकी हक्क धारावीकरांकडे (सदनिकाधारकांकडे) पूर्णतः अबाधित राहणार

अफवा 2: भविष्यात घरांची खरेदी-विक्री करता येणार नाही
सत्य: शासनाच्या नियमानुसार 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर घरांची कायदेशीर खरेदी-विक्री करता येईल

अफवा 3: मालकी हक्क नसल्याने गृहकर्ज मिळणार नाही
सत्य: 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर घर तारण ठेवून कर्ज घेता येईल

Web Title: Big relief for dharavi residents ownership rights of new homes to remain with residents rumours dismissed by officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • dharavi
  • home

संबंधित बातम्या

Why Not Water Tanks: परदेशातील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का नसतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण!
1

Why Not Water Tanks: परदेशातील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का नसतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण!

Mumbai: सिक्युरिटी गार्डची नोकरी ते यशस्वी उद्योजक… धारावीच्या या तरुणाने इतिहास कसा रचला?
2

Mumbai: सिक्युरिटी गार्डची नोकरी ते यशस्वी उद्योजक… धारावीच्या या तरुणाने इतिहास कसा रचला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.