Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget Session : करमणूक, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांवर कर आकारला जाणार

पालिकेच्या अर्थसंकल्पातून अनेक प्रकारच्या करवाढीचे व शुल्कवाढीचे सुतोवाच पालिक आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे. करमणूक करात सुधारणा, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ अशा विविध करवाढी सुचवण्यात आल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 04, 2025 | 11:46 PM
करमणूक, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांवर कर आकारला जाणार

करमणूक, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांवर कर आकारला जाणार

Follow Us
Close
Follow Us:

पालिकेच्या अर्थसंकल्पातून अनेक प्रकारच्या करवाढीचे व शुल्कवाढीचे सुतोवाच पालिक आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे. घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क, व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर, करमणूक करात सुधारणा, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ अशा विविध करवाढी सुचवण्यात आल्या आहेत.

उत्पन्न वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने लहानसहान उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. अनेक बाबींमध्ये शुल्कवाढ तसेच करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घनकचरा शुल्क वसूल करावे लागणार आहे. मात्र हे शुल्क लावण्याआधी पालिका प्रशासन कायदेशीर सल्ला घेणार आहे. शुल्क लावण्याचा निर्णय झाल्यास तर प्रत्येक घरामागे, प्रत्येक दुकानामागे लावला जाणार आहे. एक घर किंवा एक दुकान असे एकक हे शुल्क लावताना वापरले जाणार आहे.

यापूर्वी राज्य सरकारकडून आकारला जाणारा करमणूक कर गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे. मात्र महसूल व वन विभागाने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील एका तरतूदीनुसार सप्टेंबर २०१६ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत करमणूक शुल्कात सूट दिली आहे. हा कालावधी संपल्यानंतर करमणूक करात सुधारणा केली जाणार असून सुधारित दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे चित्रपट, नाटक आणि मनोरंजन कार्यक्रमांचे खेळ २०२६ नंतर महागण्याची शक्यता आहे. मुंबईत विविध व्यवसायांसाठी पालिका प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या परवान्याच्या शुल्कातही वाढ होणार आहे.

झोपडपट्टयांमधील व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. मुंबई सुमारे अडीच लाख झोपड्या असून त्यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे २० टक्के म्हणजेच ५० हजार झोपड्यांमध्ये असा व्यावसायिक वापर सुरू आहे. या झोपड्यांचा वापर गोदामे, दुकाने, उपाहारगृह, लहानमोठे उदयोग धंदे यासाठी केला जात आहे. या झोपड्यांवर मालमत्ता कर लावण्यात येणार आहे. मात्र मालमत्ता कर वसूल केला म्हणून या झोपड्या अधिकृत होणार नाही, असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. झोपडपट्ट्यांना मुंबई महापालिका रस्ते, पाणी अशा सुविधा पुरवत असते. शहरी सुविधा घेणाऱ्या या व्यावसायिक झोपड्यांनी शहराच्या भांडवली खर्चात आपला वाटा उचलण्यास हरकत नाही, अशी भूमिकाही पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Bmc budget increase entertainment fees business license fees bmc budget session marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 11:46 PM

Topics:  

  • BMC
  • Budget
  • Property Tax

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
1

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना
2

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त
3

BMC Election: महापालिका निवडणुकीत VVPAT वापरला जाणार नाही, आयोगाने सांगितले कारण, विरोधक मात्र संतप्त

Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती
4

Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.