Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु

मतदानावेळी वेगवेगळे गंभीर प्रकार समोर येत आहेत. कधी ईव्हीम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड तर कधी मतदार यादीमध्ये गोंधळ. आता मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याच्या गंभीर घटना आता समोर येत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 15, 2026 | 01:21 PM
BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु

Follow Us
Close
Follow Us:
  • रूपाली चाकणकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
  • राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
  • मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जारी केले आदेश
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. मुंबईत आज सकाळी मतदान करून आलेल्या नागरिकांच्या बोटावरील शाई अगदी सहज पुसली जात आहे. या घटनेने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता केवळ निवडणुक आणि मतदानच नाही तर आता मतदारांच्या हातावर लावली जाणारी शाई देखील चर्चेचा विषय ठरली आहे. (फोटो सौजन्य – X) 

BMC Election 2026: अभिनेता अक्षय कुमारपासून माजी राज्यपाल राम नाईक… आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

या प्रकरणी पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण आणखी तापलं. याप्रकरणी आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक नेत्यांनी आरोप केला आहे की, बोटावरील शाई पुसून बोगस मतदान देखील केलं जात आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या वादावरून आता राज ठाकरेंनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, सरकारने निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. त्यांनी जे विधानसभेच्या निवडणूकीत केले, तेच त्यांना आता देखील करायचे आहे. पण आता आम्ही असं होऊ देणार नाही. आजपर्यंत मतदान केल्यानंतर शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जात आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मतदानातील शाई प्रकरण आणि राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रेयवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं. याआधीही निवडणूकांमध्ये मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही.

BMC Election 2026: मतदानादरम्यान वांद्रेमध्ये ईव्हीएम मशीन बंद! केंद्राबाहेर गर्दी, मतदारांचा गोंधळ

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?

मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी पालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहेत. मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली आहे, असा संशय मतदारांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकरणानंतर शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा, अशा सूचना मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

Web Title: Bmc election 2026 marker marks on voters fingers can be wiped off with sanitizer raj thackeray slams election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • MNS Raj Thackeray
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…
1

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…

Nashik Election 2026 : केलं एक घडलं भलतंच! EVM वर बटण दाबलं धनुष्याचं, लाईट पेटला कमळाचा; नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ
2

Nashik Election 2026 : केलं एक घडलं भलतंच! EVM वर बटण दाबलं धनुष्याचं, लाईट पेटला कमळाचा; नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
3

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल
4

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.