Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

E-bus fare hike: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग झाले असून  ई-बसच्या वाढलेल्या तिकिर्टाच्या किमतींबद्दल पर्यटक संतापले आहेत. तिकीट विक्रीतून महसूल मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 21, 2026 | 01:13 PM
कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग
  • १०० रुपये राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचे ई-बसचे प्रति व्यक्ती आताचे भाडे
  • तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेस्ट बस सेवा बंद केल्यानंतर, उद्यान प्रशासनाने आता पर्यटकांच्या सोयीसाठी ई-बस सेवा सुरू केली आहे. तथापि, या बसेसच्या तिकिटांच्या किमतींवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे आणि प्रशासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. दरम्यान, तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल देखभाल आणि दुरुस्तीसाठी खर्च केला जातो, हे लक्षात घेऊन बसचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. असे उद्यान प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, ई-बसच्या वाढलेल्या तिकिर्टाच्या किमतींबद्दल पर्यटक संतापले आहेत, तर स्थानिक लोक बस प्रवासावरील निर्बंधांवर असंतोष व्यक्त करत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि उच्चाधिकार समितीच्या आदेशानंतर, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी बोरिवली स्टेशन आणि कन्हेरी लेण्यांमधील एसी बेस्ट बससेवा १७ जानेवारीपासून पूर्णपणे बंद करण्यात आली.

 ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

बेस्टची बससेवा पर्यावरणासाठी होती चांगली

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही महसूल मिळवणारी संस्था नाही. पर्यटकांना पार्कमध्ये प्रवेश, पार्किंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात. आता बसभाड्‌यातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. पर्यावरणासाठीही चांगली असणारी बेस्टची सेवा बंद करण्यामागील खरा हेतू काय आहे, यावर पर्यटक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

स्थानिक रहिवाशांना चालत जावे लागते घरी त्यानंतर, राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कान्हेरी लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठ पाच इं-बस सुरू केल्या. ही सेवा केवळ पर्यटकांसाठी असल्याने, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरी चालत जावे लागते. राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफांपर्यंतच्या मार्गावर ई-बस धावतात, ज्यांचे तिकीट दर प्रति प्रवासी १०० रुपये आहे.

भाडेवाढीमुळे पर्यटकांची संख्या होणार कमी

राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दावा केला की मे १९९७ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय उद्यानात बेस्ट बसेस चालविण्यास मनाई होती. तथापि, त्यानंतरही बेस्ट बस सेवा सुरूच राहिली. बोरिवली रेल्वे स्टेशन (पूर्व) आणि कन्हेरी गुंफांदरम्यान एसी बस मार्ग क्रमांक ए-१८८ चालवली जात होती. जानेवारीमध्ये ही सेवा पूर्णपणे बंद सामान्यतः १५ ते २० रुपयांदरम्यान होते. तथापि, राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचे ई-बसचे भाडे आता प्रति व्यक्ती १०० करण्यात आली. बेस्ट बसेसचे तिकीट रुपये आहे. ज्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. भाडेवाढीमुळे पर्यटकांची संख्या कमी होईल, अशी शंका आहे.

केईएममध्ये ‘एमएए आयव्हीएफ’ केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

Web Title: Borivali sanjay gandhi national park kanheri caves e bus fare hike tourist displeasure mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Sanjay Gandhi National Park

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.