Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Passengers Safety : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त राबवणार उपक्रम

परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 23, 2026 | 07:07 PM
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त राबवणार उपक्रम

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त राबवणार उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवाय) या सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते.

 मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले की, शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात ‘व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडी) व पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्यूशनचे संस्थापक प्रा.भट्ट आणि त्यांच्या टीमने सामाजिक जबाबदारीतून कोणताही आर्थिक भार न टाकता महिलांना सुरक्षा देणारा पर्यायी उपाय विकसित केला. कोरोना काळातील अडचणी, प्रशासकीय नियमांचा अभाव आणि तांत्रिक आव्हाने असूनही त्यांनी हार न मानता हा प्रकल्प पुढे नेला. परिवहन विभाग, पोलीस यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरशी एकात्मता साधत हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला असल्याचे आयुक्त भिमनवार यांनी सांगितले.

हा उपक्रम सध्या ऐच्छिक असला तरी त्याची व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन परिवहन आयुक्त भिमनवार यांनी केले. ऑटो रिक्षांच्या मागील बाजूस माहिती फलक लावणे, अ‍ॅपचा वापर वाढवणे आणि प्रवासी व चालकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य प्रतिसाद यंत्रणा आणि कमांड कंट्रोल सेंटरच्या सतत सज्जतेवरच या प्रकल्पाचे यश अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला सुरक्षेसाठी हा उपक्रम देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला.

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा, मनी लाँड्रिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त

योजनेविषयी माहिती

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

  • या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहन, चालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.
  • त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.
• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असून, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधी, देणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६, वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

 

Web Title: Bygsy innovative cost free initiative for the safety of women passengers news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Women

संबंधित बातम्या

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा
1

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

रेल्वे रुळांवरून पालिकेचा केबल-स्टेड पूल जाणार, ५५% काम पूर्ण; महालक्ष्मी-सात रस्ता…, पाहा नेमका मार्ग
2

रेल्वे रुळांवरून पालिकेचा केबल-स्टेड पूल जाणार, ५५% काम पूर्ण; महालक्ष्मी-सात रस्ता…, पाहा नेमका मार्ग

Mumbai Politics: मुंबई महानगरपालिकेत नवा ट्विस्ट! ‘उबाठा’ नेत्याचेच शिंदे गटाला साकडं; महापौरपदासाठी साहाय्य करण्याची मागणी
3

Mumbai Politics: मुंबई महानगरपालिकेत नवा ट्विस्ट! ‘उबाठा’ नेत्याचेच शिंदे गटाला साकडं; महापौरपदासाठी साहाय्य करण्याची मागणी

तुळजाभवानीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने दानच समजले जातील, दानपेटीतील अंगठी प्रकरणी मंदिर संस्थानचा खुलासा
4

तुळजाभवानीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने दानच समजले जातील, दानपेटीतील अंगठी प्रकरणी मंदिर संस्थानचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.