Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

Election News: मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 16, 2026 | 05:58 PM
दक्षिण मुंबईत लोढांचा 'मलबार हिल' गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि 'उबाठा'चा धुव्वा

दक्षिण मुंबईत लोढांचा 'मलबार हिल' गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि 'उबाठा'चा धुव्वा

Follow Us
Close
Follow Us:

 

  • कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला
  • भाजपाचे पाचही उमेदवार विजयी
BMC Election Result 2026 News Marathi: राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला. आतापर्यंत जनतेच्या केलेल्या सेवेचीच ही पावती असल्याची प्रतिक्रिया मंत्री लोढा यांनी दिली आहे.

मलबार हिल विधानसभेच्या वॉर्ड क्र. 214 मधून भाजपचे श्री. अजय पाटील यांनी मनसेच्या श्री. मुकेश भालेराव यांचा तब्बल 8371 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 215 मधून भाजपाचे श्री. संतोष ढाले यांनी उबाठाचे श्री. किरण बाळसराफ यांचा 2811 मतांनी पराभव केला. ताडदेव परिसरातील वॉर्ड क्रमांक 217 मधून भाजपाचे उमेदवार श्री. गौरांग झवेरी यांनी मनसेचे उमेदवार श्री. निलेश शिरधनकर यांच्यावर 8857 मतांनी दणदणीत विजय मिळवला.

गिरगाव परिसरातील वॉर्ड क्रमांक 218 मधील भाजपच्या उमेदवार श्रीमती स्नेहल तेंडुलकर यांनी उबाठाच्या श्रीमती. गीता अहिरेकर यांचा 7849 मतांनी पराभव केला. तर महालक्ष्मी परिसरातील वॉर्ड क्रमांक 219 चे भाजप उमेदवार श्री. सन्नी सानप यांनी उबाठाचे श्री. राजेंद्र गायकवाड यांना 7500 पेक्षा जास्त मतांनी धूळ चारली.

BMC Election 2026 Analysis: मुंबईत घिसेपिटे मराठीचे ‘भावनिक कार्ड’ फेल, ‘विकास’ ठरला गेमचेंजर! जनतेने ठाकरे बंधूंना का दिला निरोप?

विजयाचा आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या आणि महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात धावणाऱ्या विकासाच्या वेगवान डबल इंजिनला आता तिसऱ्या इंजिनची साथ मिळणार आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या व्हिजन प्रमाणे आता मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केले जाईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला असला तरी, जनतेने विकासालाच कौल दिल्याचा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.

Municipal Election Result 2026: मुंबईत कमळ फुललं! बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर; मुख्यमंत्र्यांनी म्हणाले….

Web Title: Cabinet minister mangal prabhat lodha retained the malabar hill seat and all five bjp candidates emerged victorious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Mangal Prabhat Lodha
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
1

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा
2

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

“महाराष्ट्रात युवक-युवतींसाठी…”; मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी दिली माहिती
3

“महाराष्ट्रात युवक-युवतींसाठी…”; मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.