Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; घरी जायच्या वेळेस मुंबईकरांचे प्रचंड हाल

मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2025 | 08:21 PM
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; घरी जायच्या वेळेस मुंबईकरांचे प्रचंड हाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन 
लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल 
2 इंजिनिअरवर गुन्हे दाखल केल्याने आंदोलन

Mumbai Local Train: मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा विरोध म्हणून सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले.

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने साडे पाच वाजल्यापसून लोकल सुटली नसल्याची माहिती समोर यात आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसला.

मुंब्रा रेल्वे स्थानकात काही महिन्यांपूर्वी अपघात घडला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.  याअंतर्गत लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आज रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले.

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा

ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले. याचदरम्यान आता रोहिदास मुंडे यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Railway Accident News: मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, रोहिदास मुंडे यांचा गंभीर आरोप

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजता घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना थरकाप उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आणी हीच बाब धक्कादायक आहे. गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. ही बाब नवीन नाही, मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची?

कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.”

 

Web Title: Central railway employee protest against mumbra accident case fir in engineer csmt breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • Accident Case
  • CSMT
  • Mumbai local train

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.