Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल, दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा

Mumbai Local News Marathi: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून आता दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला आळा बसणार आहे. लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल दिसणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 21, 2026 | 08:39 AM
लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल,दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा

लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल,दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा

Follow Us
Follow Us:
  • प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेचे महत्त्वाचे पाऊल
  • लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल
  • दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा
मुंबई : दररोज लोकलच्या दरवाजात लटकून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या चर्चेनंतर स्वयंचलित दरवाजांची सुविधा असलेली पहिली नॉन-एसी (साथी) लोकल लवकरच मुंबईच्या रुळांवर दाखल होणार असून, प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आणि दीर्घकालीन परिणाम करणारा बदल मानला जात आहे.

चेन्नई येथील इंटिग्रल कोच फैक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली ही अत्याधुनिक पहिली नॉन-एसी (साधी) लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध तांत्रिक तसेच सुरक्षा चाचण्या घेण्यात येतील. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लोकल नियमित प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे.

एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना, प्रताप सरनाईकांची माहिती

लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे यामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात. अतिगर्दीमुळे अनेकांना दरवाजात उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन नव्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेनुसार गाडी सुरू होण्यापूर्वी दरवाजे आपोआप बंद होतील आणि स्थानकावर पूर्ण थांबल्यानंतरच उघडतील. तसेच दरवाजे व्यवस्थित बंद नसतील तर गाडी सुरू होणार नाही. अशी अतिरिक्त सुरक्षा प्रणाली ही बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी ICF
दिली आहे.

लोकलची ठळक वैशिष्ट्ये

स्वयंचलित उघड-बंद होणारे दरवाजे.
सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली
डब्यांमधील अंतर्गत जोडणी (व्हेस्टिच्युल)
आधुनिक सुरक्षा यंत्रणा
आपत्कालीन सुविधा
अपघात टाळण्यासाठी विशेष रचना

हवा खेळती राहण्यासाठी विशेष उपाय

नॉन-एसी लोकलमध्ये दरवाजे बंद ठेवल्यास गुदमरल्यासारखे होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने डब्यांच्या रचनेत विशेष बदल केले आहेत. सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली, मोठ्या खिडक्या, उत्तावरील हवेचा प्रवाह वाढविणारी यंत्रणा तसेच नैसर्गिक हवा खेळती राहील अशी रचना करण्यात आली आहे.

एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे शक्य

या लोकलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डब्यांदरम्यान देण्यात आलेली कोस्टिब्युल कनेक्टिव्हिटी. त्यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसन्य डब्यात सहजपणे जाता येणार आहे. गर्दीच्या वेळी यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.

टप्याटप्याने येणार लोकल सेवेत

ही लोकल सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे. त्यानंतर तिच्या कामगिरीचा आढावा घेऊन अशाच प्रकारच्या आणखी लोकल मुंबई उपनगरीय सेवेत आणण्याचा रेल्वेचा मानस आहे. भविष्यात सर्व नवीन लोकल अधिक सुरक्षित, तांत्रिकदृ‌ष्ट्‌या सक्षम आणि प्रवासी-अनुकूल करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात असे.

मुंबईकरांना दिलासा! पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार मोठी ताकद

Web Title: Central railway mumbai local train automatic door icf passenger safety mumbra accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • central railway
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
1

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
3

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
4

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.