Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद

29 जूनपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 12 साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्यांच्या वेळेत एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रवासी संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 01:03 PM
मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; 'एसी'साठी १२ लोकल करणार बंद

मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; 'एसी'साठी १२ लोकल करणार बंद

Follow Us
Follow Us:
  • 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या 12 साध्या लोकल फेऱ्या बंद करून एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.
  • या निर्णयामुळे दररोज हजारो प्रवाशांना वाढत्या गर्दीचा सामना करावा लागू शकतो.
  • साध्या लोकल रद्द करण्याऐवजी एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेल्या मध्य रेल्वेच्या लोकल सेवांवर सोमवारपासून मोठा परिणाम होणार आहे. २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील १२ साध्या लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकलच्या वेळेत १२ एसी लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गर्दीच्या वेळेत साध्या लोकल रद्द करून एसी लोकल सुरू करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या वाढत असताना मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकल फेऱ्या वाढवण्याची आणि १५ डब्यांच्या लोकल चालवण्याची मागणी होत असताना लोकल रद्द करण्याचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. एका अंदाजानुसार, पीक अवरमध्ये एका लोकलमधून सुमारे ५ ते ६ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे १२ लोकल रद्द झाल्यास तब्बल ४० ते ५० हजार प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: istock) 

रद्द करण्यात आलेल्या लोकलच्या प्रवाशांना इतर लोकलमधून प्रवास करावा लागणार आहे. मात्र, आधीच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये अत्तिरिक्त प्रवासी आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुंबई लोकलमधील गर्दीमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रवासी संघटनांचा विरोध

कॅटचे राष्ट्रीय महामंत्री शंकर ठक्कर म्हणाले एसी लोकल चालवण्याच्या नावाखाली हजारो सामान्य प्रवाशांना त्रास देणारा हा निर्णय आहे. मुंबईतील लाखो प्रवाशांच्या अडचणींची माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

विरोध नाही, मात्र भाडे कमी करा

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता आरगडे यांनी सांगितले की, आमचा एसी लोकलला विरोध नाही. मात्र साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालवणे चुकीचे आहे. त्यामुळे इतर लोकलमध्ये गर्दी वाढेल. कोणताही बदल करण्यापूर्वी प्रवाशांना किमान एक महिना आधी माहिती द्यायला हवी.

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

सामान्य प्रवाशांवर अन्याय : प्रवासी संघटना

रेल्वे प्रवासी सेवा सुविधा संघटनेचे अध्यक्ष पारसनाथ तिवारी यांनी सांगितले की, नॉन एसी लोकल बंद करून एसी लोकल सुरू करणे म्हणजे सामान्य प्रवाशांवर अन्याय आहे. एसी लोकलचे भाडे कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची अमलबजावणी झालेली नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Central railway to cancel 12 regular local trains from june 29 ac services to replace them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Local Trains
  • Mumbai Local
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.