Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; 'सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा', स्थानिकांची मागणी
होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप
हेल्मेट नक्की सुरक्षित साधन आहे, यात वाद नाही. परंतू आता रोहा शहरात हेल्मेट न घातल्यास दंड वसुलीला सुरुवात झाल्याने शहरामध्ये हि कारवाई उचित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांच्या तुलनेत रोहा हे एक छोटे शहर आहे. त्यामुळे येथील लोकांना अनेकदा शहराच्या आतच प्रवास करावा लागतो आणि अशा प्रवासासाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे नागरि वसतीमध्ये अशी कारवाई करू नयेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रोहा पोलिसांनी वाहन चालविताना शिस्त, धूम स्टाईल रोखली तर वाहतूक, रहदारी अधिक सुरक्षित होईल, रोह्यातून बाहेर जाणाऱ्यांना हेल्मेट घालणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे, पण शहरातील स्थिर वस्तीत हेल्मेट सक्तीला नागरिकांनी विरोध केला असून तीव्र नाराजी व्यक्त होतं आहे.
अनेक लोक विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात जाणारे तरुण एकाच दुचाकीवर तिघे जण बसून अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवतात. अनेकदा नवीन गाड्या त्यावर ट्रीपल सीट सुसाट जाणाऱ्या गाड्यांमुळे मुख्यतः आदिवासी मुलांचे अपघात झाल्याचे समोर आले आहे. काहींनी अशा अपघातात जीव गमावला लागला आहे. पोलिसांनी अशांवर कारवाईचा बडगा दाखविणे गरजेचे असताना सामान्य नागरिकांना नागरि वस्तीत टार्गेट केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात अगदी किरकोळ अंतरासाठी दुचाकीचा वापर अपरिहार्य झाला आहे. दूध, भाजीपाला आणणे, दैनंदिन कामांसाठी नागरिक दुचाकी वापरतात, त्यामुळे सर्वांवर सरसकट हेल्मेट सक्ती, दंडाची अमलबजावणी करताना व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. दंडाच्या तरतुदींमध्ये वास्तव परिस्थितीचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. – संदीप सरफळे, सरचिटणीस, रोहा.
शहराबाहेर जाणा-यांना हेल्मेट सक्ती करणे ठिक आहे, पण शहरात वाहतुकीचे नियम पाळले जावेत, धूम स्टाईल बाईकिंग रोखली जावी, वाहनांना शिस्त लावली जाणे गरजेचे आहे. सकाळी धाटावमध्ये शंभरहून अधिक जण रोह्याहून हेल्मेट शिवाय येत असलेले पाहतो, तेव्हा शहरात हेल्मेट सक्ती चुकीची वाटते. – राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते
हेल्मेट सक्तीला कोणाचाही विरोध नाही, मात्र रोहासारख्या छोट्या शहरात केवळ दंडावर भर देण्यासाठी ही कारवाई नसावी. वाहतूक शिस्त, ट्रिपल सीट आणि बेदरकार वेगावर कारवाई होणे अधिक गरजेचे आहे. – एडवोकेट दीपक भगत, रोहा
रोह्यात कोणताही कायदा, नियम, करवाढ, दरवाढ ही लोकांचे मत अथवा जनसुनावणी न घेता अचानकपणे लागू करण्याचा अघोषित पायंडा पडत चालला आहे. – महेंद्र मोरे, ज्येष्ठ पत्रकार
अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, नागरिकांमध्ये जागृती अभियान राबविल्यास अनेक अवैध धंद्यांवर कारवाईस मदत होईल. अवैध धंद्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आहे. – महेश बामगुडे, अध्यक्ष दसबा फाऊंडेशन






