महाराष्ट्र 'ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था' बनू शकेल का?
CM Devendra Fadnavis on Trilion Dollar Economy : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (23 ऑगस्ट) नवभारत – नवराष्ट्रच्या Maharashtra 1st Conclave या कार्यक्रमात राज्याच्या विकासाचा संपूर्ण आराखडा मांडला. त्यांनी राज्याच्या परिवर्तनकारी विकास प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते विकसित महाराष्ट्रासाठी एक योजना तयार करत आहेत. भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि याअंतर्गत २०३० पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
नवभारत आणि नवराष्ट्र यांनी आयोजित केलेले पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 च्या माध्यमातून, जिथे राज्याच्या प्रगती आणि आव्हानांवर एक विशेष पॅनेल चर्चा करण्यात आली. या व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि परिवह मंत्री यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “आम्ही महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एक रोड मॅप तयार केला आहे. मला वाटते की गेल्या वर्षी आम्ही अर्धा ट्रिलियनचा टप्पा ओलांडला. सर्व भारतीय राज्यांमध्ये, आम्ही २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या सर्वात जवळ आहोत. चांगले प्रशासन आणि निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र वेगाने विकसित होत आहे.
तसेच आर्थिक विकासासाठी दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा वेग खूप महत्त्वाचा आहे. यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे बांधण्यात आला आहे. नाशिकमध्ये उद्योग आणि पर्यटनाच्या विकासासाठी मोठी क्षमता आहे. कुशल मनुष्यबळ आणि अनुकूल हवामानामुळे येथे गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधी वाढत आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मुळे येथे संरक्षण क्षेत्राची चांगली परिसंस्था आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर बांधले जात आहे, ज्याचा नाशिकलाही फायदा होईल. नाशिक ते वाढवन या ग्रीनफिल्ड रोडच्या बांधकामामुळे ही कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही पायाभूत सुविधा, नवीन उद्योग, पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या धोरणे आणि इतर अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारी योजना आधीच राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्र, शेतीमध्ये गुंतवणूक कशी करावी, शेतीमध्ये मूल्यवर्धन कसे करावे इत्यादींचा समावेश आहे. म्हणून एक संपूर्ण योजना बनवली जात आहे. या योजना राबविण्यासाठी आम्ही लक्ष्य निश्चित केले आहे, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज