वाईट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
चांगले कोलेस्ट्रॉल (HDL – हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. HDL कोलेस्ट्रॉलला “चांगले” कोलेस्ट्रॉल मानले जाते कारण ते रक्तात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकते आणि यकृताकडे नेले जाते, जिथे ते प्रक्रिया करून शरीरातून बाहेर टाकले जाते. म्हणून, जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल अर्थात LDL कमी करायचे असेल तर तुम्हाला अशा गोष्टी खाव्या लागतील ज्यामुळे नैसर्गिकरित्या चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी, आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदात फॅटकटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरव्या पानांबद्दल सांगणार आहोत.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येऊ लागतो. आहारात बदल, जंक फूडचे जास्त सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते. याशिवाय, ट्रायग्लिसराइड आणि हार्मोन असंतुलनाच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. डॉक्टरांच्या गोळ्यांसोबतच, शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवनदेखील तितकेच महत्वाचे आहे. यामुळे ट्रायग्लिसराइड आणि हार्मोन असंतुलन दुरुस्त केले जाईल. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन कसे करावे याबाबत सांगत आहोत. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याचे गुण अधिक चांगल्या पद्धतीने सांगितले आहेत (फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्यात ओव्याची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हिरव्या ओव्याच्या पानांपासून भाजीदेखील बनवली जाते. शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ट्रायग्लिसराइड्सची समस्या कमी होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्यांनी विशेषतः ओव्याच्या पानांचे सेवन करावे.
नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देतील Vitamin B युक्त 5 भाज्या, खायला आजच सुरू करा
ओव्याच्या पानांमध्ये पचन सुधारण्यास मदत होते. त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आराम देतात. ते पोटदुखी आणि गॅस कमी करण्यासदेखील उपयुक्त आहेत. अगदी लहान बाळाच्या पोटदुखीवरदेखील ओवा हे उत्तम रामबाण औषध आहे आणि आपल्या आजी वा वरीष्ठ लोकांकडून याचे फायदे नेहमीच सांगितले जातात.
इतकंच नाही तर थायरॉईड, मासिक पाळी, वाढते वजन, हार्मोनल असंतुलन इत्यादी अनेक आजारांवर ओव्याची पाने खावीत. तसेच, सायनस, ब्राँकायटिस, पोटाचा संसर्ग, शरीरातील बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी ओव्याची पाने खावीत. कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ओव्याची पाने उत्तम ठरतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.