Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Price Hiked : मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस

गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात वाढ केली आहे. किरकोळ दरात आता प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 09:55 AM
मुंबई सीएनजी दरात २ रुपयांची वाढ

मुंबई सीएनजी दरात २ रुपयांची वाढ

Follow Us
Follow Us:

मुंबई : इराण-अमेरिका संघर्षामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे इंधनाचे दरही चांगलेच वाढले आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलच्या दरात वाढ झाली आहे. असे असताना आता मुंबईत सीएनजीच्या दरातही दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका वाहनधारकांना होणार आहे.

गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात वाढ केली आहे. किरकोळ दरात आता प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआरच्या इतर भागांमध्ये आता सीएनजीचा दर प्रति किलो ८६ रुपये असेल. यापूर्वी १४ मे रोजी दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही वाढ केली गेली.

Inflation Data : 42 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला, महागाईचा महा-विस्फोट; एप्रिलमध्ये तब्बल ‘इतक्या’वर पोहोचला आकडा

सध्या, एमजीएल मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, रायगड, रत्नागिरी, लातूर आणि धाराशिव येथे सीएनजीचा पुरवठा करते. प्रति किलोमीटर दरानुसार हे इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त असले तरी, या दरवाढीमुळे सीएनजीवर अवलंबून असलेल्या खाजगी वाहन मालक, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹२.६१ आणि डिझेलच्या दरात ₹२.७१ ने वाढ करण्यात आली. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतील ही चौथी दरवाढ आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा भाव प्रति लिटर ₹१११.२१ आणि डिझेलचा भाव ₹९७.८३ आहे. आता सीएनजी दरवाढीचा फटका वाहनधारकांना बसणार आहे.

11 दिवसांत 8 रुपयांनी महागले पेट्रोल

गेल्या ११ दिवसांत पेट्रोल किमतीत तब्बल ८ रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार आहे. गेल्या १२ वर्षांचा विचार करता पेट्रोलच्या किमतीत ३८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 वर जाणार; काँग्रेस नेत्याचं विधान

शेतकऱ्यांना डिझेलची गरज असताना अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे. काही दिवसांत देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title: Cng prices in mumbai hiked by 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • CNG Price
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
2

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
4

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.