फोटो सौजन्य सोशल मिडिया
Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज 02 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजे; महात्मा गाँधी जयंतीच्या दिवशी मुंबई मधील छत्रपती शिवाजी पार्क दादार येथे आज आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले. हे आंदोलन ‘जेल भरो आंदोलन’ पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे आणि या आधी झालेला वाद पाहता छत्रपती शिवाजी पार्क मधील स्थानिक नागरिक, दुकानदार आणि परिसरातील व्यवस्थापन सदस्यांना खालील प्रमुख त्रासांना सामोरे जावे लागले आहे.
15 ते 20 जणांचा गट आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यांच्याकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेळीच मध्यस्थी करत घोषणाबाजी करणाऱ्या या गटाला आंदोलनस्थळापासून दूर घेऊन गेले.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टिका केली. “आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. महात्मा गांधींना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण हा गांधी आहे. आरएसएसच्या लोकांनी जितका त्रास महात्मा गांधींना दिला नाही. त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला दिला आहे.पण गांधी मरत नाही. गांधी हे या देशाचा आत्मा आहेत. गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. पण या देशात महात्मा गांधींच्या विचाराने, त्याच्या मार्गाने चालणारे आहे. त्याच्या विचारानेच हा देश टिकला गेला आहे.
गोडसे विचारांच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही महात्मा गांधीजींना कधीही संपवू शकत नाही. एक महामानव येतो आणि म्हणतो मी नॉन बायोलॉजिकल आहे, आम्हालाही कळतंय की तुम्ही मनु्ष्य असूच शकत नाही. ते स्वत:ला गांधी आणि नेहरुंपेक्षा मोठं करू पाहत आहे. पण ते या जन्मात काय पुढील सात जन्मातही शक्य नाही.
गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांची बरोबरी करण्याची तुमची पात्रता नाही. गांधीजी या देशाचा आत्मा आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा कणा; जवाहरलाल नेहरू हे या देशाचे मन आहेत,” अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर टिता केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त जनतेला लुटाता येतं, त्यांच्याकडे देशाला देण्यासाठी काही नाही. नोटबंदी करून त्यांनी जनतेला रांगा लावायला लावल्या, कोरोनामध्ये लस घेण्यासाठी रांगा लावायला लावल्या आता मतदारयादीत नाव येण्यासाठीही रांग लावायला सांगत आहे. अशी टीकाही कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.
आंदोलनामुळे वाहतूककोंडीवर परिणाम होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील रहदारीत अडथळा निर्माण होत आहे. या आंदोलनामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आणि नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध करण्यात आले. शिवाजी पार्क हा एक संवेदनशील आणि ‘शांतता क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या राजकीय आंदोलनांमुळे येथील शांतता भंग होत असते. अशी स्थानिकांची तक्रार आहे. तसेच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे स्थानिक दुकानदारांच्या रोजवर परिणाम होत आहे. या परिसरातील होणाऱ्या गर्दीमुळे आणि गोंगाटा मुळे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना याचा नाहक त्रास सहण करावा लागत आहे. त्याच बरोबर आपत्कालीन वाहनांच्या खास करुन रूग्णवाहिका येण्या-जाण्यास त्रास होत आहे.
मुंबई पोलिसांनी 2013 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरी सुध्दा कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र जमल्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






