Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; आमदार रोहित पवारांची मागणी

राज्यात दररोज सरासरी २४ बलात्काराच्या घटना घडत असल्याचे भीषण वास्तव समोर ठेवत त्यांनी महाराष्ट्र सरकारने 'शक्ती कायदा' तातडीने लागू करावा, अशी मागणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 09:37 AM
शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; रोहित पवारांची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही अत्यंत चिंताजनक असून, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. राज्यात दररोज सरासरी २४ बलात्काराच्या घटना घडत असल्याचे भीषण वास्तव समोर ठेवत त्यांनी महाराष्ट्र सरकारने ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करावा, अशी मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. त्यात त्यांनी म्हटले की, राज्यातील ही परिस्थिती पाहता शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आणि कायदा मंजूर करण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पवार यांनी केली. दरम्यान, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लवकरात लवकर अमलात आणावा, असा आग्रह आता विरोधकांकडून धरला जात आहे.

शक्ती कायद्यात नेमक्या काय तरतूदी?

मृत्युदंडाची तरतूद : बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे.

वेगवान तपास : गुन्हा दाखल झाल्यापासून १५ दिवसांच्या आत तपास पूर्ण करणे आणि त्यानंतर ३० दिवसांच्या आत खटल्याचा निकाल लावण्याचे बंधन असेल.

विशेष न्यायालये : अशा प्रकरणांसाठी जिल्ह्यानुसार विशेष न्यायालये आणि विशेष पोलीस पथकांची स्थापना करणे.

सोशल मीडिया गैरवापर महिलांना सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून त्रास दिल्यास किंवा धमकावल्यास कठोर शिक्षेची तरतूद.

नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार

नसरापूर येथील चिमुरडीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, माहिती पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी दिली. नसरापूर गावात चिमुरडीवर अत्याचारप्रकरणात नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

नसरापूरमध्ये नेमकं काय झालं?

पुण्यातील रहिवशी असलेली चिमुरडी आजीकडे नसरापूर येथे सुट्टीसाठी आली होती. पण, खेळताना ती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी शोध घेतला. पण, ती सापडत नसतानाच पोलिसांना दुपारी सव्वा पाचच्या सुमारास याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान, याघटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि भोर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.

Madhya Pradesh Crime : माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

Web Title: Convene a session for the shakti act mla rohit pawar demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
4

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.