Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News : किर्ती महाविद्यालयाचा अजब प्रकार, पास विद्यार्थींना केलं नापास; युवासेनेचा इशारा

दादर येथील कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयातील 70 ते 80 विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन निकालात तांत्रिक त्रुटीमुळे चुकीने “फेल” नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला भेट देत प्राचार्यांना निवेदन दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 07:35 PM
किर्ती महाविद्यालयाचा अजब प्रकार, पास विद्यार्थींना केलं नापास; युवासेनेचा इशारा

किर्ती महाविद्यालयाचा अजब प्रकार, पास विद्यार्थींना केलं नापास; युवासेनेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • दादरच्या कीर्ती महाविद्यालयात निकालाचा गोंधळ!
  • 70-80 विद्यार्थ्यांना चुकीने ‘फेल’ दाखवल्याचा आरोप
  • दादरच्या कीर्ती महाविद्यालयाला युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
मुंबई/नीता परबः Dadar Kirti College result issue : दादरच्या कीर्ती महाविद्यालयातील अजब प्रकार समोर आला असून कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयात ऑनलाइन निकालातील तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 70 ते 80 विद्यार्थ्यांना चुकीने “फेल” दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण गुण मिळवूनही निकालात अपयशी दाखवल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर युवा नेते समाधान सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना माहिम विधानसभा संपर्क प्रमुख गौरेश प्रेम कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (2 जून 2026) महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी प्राचार्यांकडे निवेदन सादर करत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आले.

SPJIMR च्या अभ्युदय उपक्रमातील विद्यार्थ्यांची SSC-HSC परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी! समुदायाधारित शिक्षण मॉडेलची पुन्हा एकदा सिद्धता

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण गुण मिळवूनही ऑनलाइन निकालात तांत्रिक त्रुटीमुळे “फेल” दाखवले जात असल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिली. या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले.

यावर महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मार्कंडे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. निकालातील तांत्रिक बिघाड दूर करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका महाविद्यालय प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात त्वरीत तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. यावेळी विभाग प्रमुख संतोष तेलवणे, विभाग समन्वयक गणेश कदम, विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर, शाखा प्रमुख अभिजीत राणे, युवा विभाग प्रमुख चेतन राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे महाविद्यालयीन निकाल प्रक्रियेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

RRB Jobs 2026: आरआरबी एनटीपीसी युजी परीक्षा शहर माहिती पत्रक मोबाईलवर कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सोपी पद्धत….

Web Title: Dadar kirti college result error students failed yuva sena warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • dadar
  • Student

संबंधित बातम्या

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
1

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ
2

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
3

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Munshi Premchand books: मेहनत, संघर्ष आणि स्वप्नांची कथा सांगणारे मुन्शी प्रेमचंद यांची ‘ही’ ३ सर्वोत्तम पुस्तके एकदा वाचाच
4

Munshi Premchand books: मेहनत, संघर्ष आणि स्वप्नांची कथा सांगणारे मुन्शी प्रेमचंद यांची ‘ही’ ३ सर्वोत्तम पुस्तके एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.