मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन (फोटो सौजन्य - pinterest)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई विमानतळावरील एका प्रवाशाच्या बॅगेत एक धोकादायक रसायन आढळलं. या रसायनामुळे विमानतळावर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र ग्राउंड स्टाफने वेळीच या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आणि पोलिसांनी संबंधित प्रवाशाला विमानातून खाली उतरवलं. या घटनेनंतर प्रवासी आणि त्याच्यासह इतर 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा-न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नागपुरातील घटना
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे या अपघातात विमानातील शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले. सामान लोड करताना एका प्रवाशाच्या बॅगेत हायड्रोजन स्पिरीट आढळलं. सामान लोड करण्यापूर्वीच या प्रवाशाच्या बॅगेने पेट घेतला. त्यामुळे ग्राउंड स्टाफने बॅग इतर बॅगपासून वेगळी केली आणि विमानतळ प्राधिकरणाला या घटनेबाबत माहिती दिली. सीआयएसएफ टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी प्रवाशाला त्याच्या बॅगेसह विमानातून खाली उतरवले.
प्रवाशाची चौकशी केली असता त्याच्या बगेत हायड्रोजन स्पिरीट असल्याचं निष्पन्न झालं. आणि तो हे रसायन काँगोला घेऊन जात होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई झोन 8 चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, बॅग तपासण्यात आली. मात्र ती लोड होण्यापूर्वीच ठिणगी पडली आणि बॅगेने पेट घेतला. त्यानंतर बॅग इतर सामानापासून वेगळी करून प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले. रसायनाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला आरोपी समीर याला कांगोमध्ये व्यवस्थापकपदी नोकरी मिळाली होती. त्यामुळे तो इथोपियावरून कांगोला जाणार होता.
हेदेखील वाचा-डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
डीसीपी दीक्षित गेडाम यांनी पुढे सांगितलं की, कांगो येथील नवीन शर्मा याने मुंबईतून येताना एक बॅग आणण्यास सांगितली होती. वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने हे पार्सल समीर बिस्वासपर्यंत पोहोचवण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी अखिलेश यादव हा अंधेरीचा रहिवासी आहे. नंदन यादव यांच्यासोबत अखिलेश यादव विमानतळावर गेले. दोघांनी मिळून ते पार्सल प्रवाशी समीर बिश्वास याला दिले. विमानात रसायने पोहोचणे ही गंभीर बाब आहे. विमानतळावरील चुकीची चौकशी करण्यात येत आहे. रसायनांनी भरलेली बॅग चेक इन करण्यापूर्वी तपासली गेली पाहिजे. समीर बिस्वास नावाचा प्रवासी इथियोपियाच्या फ्लाइटने काँगोला पार्सल घेऊन जाणार होता. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांची एक चूक आणि विमान हवेतच ब्लास्ट झालं असतं. विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाचे संपूर्ण सामान तपासले जाते. मग तरीही विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या प्रवाशाची बॅग तपासली नाही का, याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.