डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्या प्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी संप पुकराला आहे. रुग्णालयांना सेफ झोन म्हणून घोषित करा आणि या हत्याकांडातील दोषीला लवकरात लवकर शिक्षा करा, अशी मागणी डॉक्टर आणि संपूर्ण देशाने केली आहे. सोशल मिडीयावर देखील ह्या प्रकरणी अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. राज्यभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. याचा परिणाम आता आरोग्य सेवेवर होताना पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा –नाशिकमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 15 हल्लेखोर ताब्यात
डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्या प्रकरणानंतर आता इतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयांना सेफ झोन म्हणून घोषित करा या मागणीसाठी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या या संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपात मुंबई, पुण्यासह अनेक रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनांनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय द्यावा, अशी मागणी इतर डॉक्टरांनी केली आहे. याशिवाय आता खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर सुध्दा या संपात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईमर्जन्सी सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या नियोजित शस्त्रकिया देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा –कोलकाता अत्याचार प्रकरण: इंडियन मेडिकलअसोशिएशनचा 17 ऑगस्टला देशव्यापी संप
मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपात विद्यार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि अध्यापक यांनी सहभाग घेतला आहे. मुंबईतील केईएम, नायर, शीव आणि कूपरचे अनेक डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या नियोजित शस्त्रकिया देखील रद्द करण्यात आल्या आहेत. ईमर्जन्सी सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी आता आरोग्यसेवा कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील प्रसिध्द ससून रुग्णालयातील 566 निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी झाले आहेत. शिवाय एमबीबीएसच्या 250 अंतर्वासित विद्यार्थ्यांनी देखील संपात सहभाग घेतला आहे. रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे.
याप्रकरणी, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील शिक्षकांची संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी सांगितलं की, ‘म्युनिसिपल मेडिकल टीचर्स असोसिएशन’नेही (एमएमटीए) या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केवळ अत्यावश्यक व अपघात विभागातील सेवा सुरू ठेवल्या जाणार आहेत. आज होणाऱ्या आंदोलनात तब्बल 90 हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे. याला ‘मार्ड’ने पाठिंबा दिला आहे.