Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Devendra Fadnavis : सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 05, 2026 | 07:52 PM
Devendra Fadnavis : २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Devendra Fadnavis : २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग
  • पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा
  • नागरिक व कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
 

२०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

रविवारी 12 तासांचा विशेष ब्लॉक

मेट्रो मार्गिका २-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यतेनुसार रविवारी १२ तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा. या कामामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा. कोणताही नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आगाऊ नियोजन करावे. वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधावा. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

नागरिक व कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधा घटकांचे अद्ययावत ‘मॅपिंग’ करावे. नागरी सुविधा किंवा पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध होऊन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होईल, अशी यंत्रणा विकसित करावी.
पायाभूत सुविधांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक फलक, बॅरिकेड्स आणि अन्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात. प्रकल्पस्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करणारी स्वतंत्र कंपनी निर्माण करून या सेवांसाठी अत्यल्प दराचे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (पाणीपुरवठा) पराग जैन आदी उपस्थित होते.

Web Title: Devendra fadnavis 2027 year of metro cm major statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Madhuri misal
  • Metro

संबंधित बातम्या

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर
1

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
2

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.