Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीचे जागावाटप जाहीर का झाले नाही? देवेंद्र फडणवीस स्पष्टचं बोलले…

आतापर्यंत जवळपास 240 जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. पण 48 जागांचा तिढा अद्याप कायम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भाजपने 120 हून जास्त जागा मिळवण्याचे उदिदष्ट ठेवले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 16, 2024 | 02:58 PM
2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस

2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.  येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपही जाहीर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मंगळवारीच महायुतीचे जागावाटप जाहीर कऱणार असल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी महायुतीची पत्रकार परिषदही होणार होती. पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कधी जाहीर होणार, महायुतीची पत्रकार परिषद रद्द का झाली, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

त्यानंतर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळीही महायुतीचे जागावाटप जाहीर होईल असी अपेक्षा होती. पण आजही महायुतीचे जागावाटप झाले नाही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागावाटपाबद्द्ल विचारण्यात आले, याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जागावाटपाचे काम जवळपास होत आले आहे. जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच जागा राहिल्या आहेत. कोणत्या ठिकाणी कोणत्या पक्षाची ताकद आहे. तीनही पक्ष मिळून कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. कोणाकडे चांगला उमेदवार हे सर्व पाहून आम्ही जागावाटप करत आहोत. फॉर्म्युला मध्येच सांगता येत नाही. जागावाटप झाले की त्यादिवशी कोणाला किती जागा मिळाल्या तेही सांगू आणि फॉर्म्युलाही सांगू.

हेही वाचा:  लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, एकनाथ शिंदेंनी नेमकी कोणाला दिली धमकी?

दरम्यान, आतापर्यंत जवळपास 240 जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. पण 48 जागांचा तिढा अद्याप कायम असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भाजपने 120 हून जास्त जागा मिळवण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. त्यासाठी 155 ते 160 जागा लढण्याबाबत भाजपचे ठामपणे ठरवले आहे. भाजपने 155 ते 160 जागा लढवल्यास शिंदे गट आणि पवार गटाला 128-133 जागाच शिललक राहतात. त्यातही 70-80 जागा शिंदे गटाला आणि 50-60 जागा अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे.  त्यामुळे महायुतीतील जागावाटपासाठी अजून दोन-तीनदिवस लागण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या जागांसाठी वाद आहे. त्याठिकणी भाजपचे पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील अशी माहिती समोर आली आहे.

भाजप 155 जागांवर ठाम असल्याने  शिंदे गट आणि अजित पवार गट यांचेही जागावाटप रखडले आहे. त्यातच काही जागांवर महायुतीतील तीनही पक्षांनी दावा केल्याने या जागांवाटप रखडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतरच हा तिढा सुटू शकतो. दरम्यान नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा:  प्रेयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बनला गँगस्टर! लॉरेन्स बिष्णोईची प्रेमकहाणी माहिती आहे का?

Web Title: Devendra fadnavis spoke clearly about the seat allocation of the grand alliance nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
2

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.