सामान्य महाविद्यालयातून हा विद्यार्थी गँगस्टर बनण्यामागे कारण आहे त्याचा भूतकाळ. आपल्या प्रेयसीच्या निघृण हत्येनंतर असूया आणि बदल्याच्या भावनेतून त्याने गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. आज देशातील सर्वात टाॅपचा गँगस्टर म्हणून त्याची ओळख आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
प्रेयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बनला गँगस्टर! लॉरेन्स बिष्णोईची प्रेमकहाणी माहिती आहे का?
राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी आता लॉरेन्स गँगने घेतली आहे. यानंतर आता लॉरेन्स बिष्णोई हे नाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे
आता कॉन्व्हेंट शाळेतन शिकलेला हा तरूण नक्की गँगस्टर कसा बनला या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात येत आहे. प्रयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर असुया आणि बदल्याच्या भावनेतून लाॅरेन्स हा गँगस्टर बनला असे मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येते
लाॅरेन्स ही प्रेम कहाणी 2008 सुरु झाली. तेव्हा तो दहावीत शिकत होता. यावेळी त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. काजल असं त्या मुलीचं नाव होतं. त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्राचे रूपांतर प्रेमात झाले
लाॅरेन्स बिष्णोई याच सुरुवातीचं शिक्षण पंजाबमधील अबोहर येथील कॉन्व्हेंट शाळेत झालं. यानंतर त्याने आणि त्याची प्रेयसी चंदीगडच्या डीएव्ही काॅलेजमध्ये शिक्षणासाठी गेले. काॅलेज संपल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र घडलं काही भलतचं...
लाॅरेन्सने काॅलेजमध्ये मित्रांची एक टोळी तयार केली होती. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्स बिश्नोई प्रतिस्पर्धी टोळीकडून निवडणूक हरले. यानंतर दोन्ही टोळ्या समोरासमोर आल्या.
प्रतिस्पर्धी टोळीने लाॅरेन्सच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याचा आरोप केला जातो. मात्र हा केवळ अपघात असल्याचेही सांगण्यात आले. यानंतर बदला घेण्यासाठी लाॅरेन्स बिष्णोईने पंजाब युनिव्हर्सिटीची स्टुडंट ऑर्गनायझेशन (SOPU) नावाची टोळी सक्रिय केली
आपल्या प्रेयसीला गमवल्याने तो संतापला होता. त्याने एक रिव्हॉल्व्हर खरेदी केली आणि प्रेयसीच्या हत्येचा आरोप असणाऱ्या सर्वांवर गोळाबार केला. अशाप्रकारे त्याने गुन्हागारी विश्वात प्रवेश केला