Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Pollution : विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Mumbai Pollution News: देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 05:55 PM
विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Follow Us
Close
Follow Us:
  • खोट्या अहवालांचा भांडाफोड करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी
  • पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संतप्त
  • बैठकीत पालिका अधिकारी नागरिकांच्या प्रश्नाबाबत मूग गिळून
  • विषारी वायूमुळे नागरिकांना विविध आजारांची लागण
  • शताब्दी रुग्णालयाची बिकट स्थिती
नीता परब , मुंबई: देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले असताना पालिका अधिकारी मात्र “सर्व काही सुरळीत” असल्याचा दिखावा करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर खासदार संजय दिना पाटील यांनी जोरदार टीका करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. चेंबूर पश्चिम येथील पालिका कार्यालयात आयोजित बैठकीत उप आयुक्त संध्या नांदेडकर, विविध विभागांचे अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालिका अधिकारी नागरिकांच्या प्रश्नाबाबत मूग गिळून

बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकताना दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी “लोक मरत आहेत आणि अधिकारी फक्त कागदोपत्री काम दाखवत आहेत” अशा शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला.

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

विषारी वायूमुळे नागरिकांना विविध आजारांची लागण

देवनार डम्पिंगमधून निघणाऱ्या विषारी वायू, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्वचारोग, श्वसनाचे विकार आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी बैठकीत मांडली. मात्र पालिका अधिकारी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटत असल्याची दिसून आले.

शताब्दी रुग्णालयाची बिकट स्थिती

शताब्दी रुग्णालयातील गंभीर अनागोंदीचाही भांडाफोड करण्यात आला. रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. मात्र खासदारांनी बैठकीतच एक धक्कादायक व्हिडीओ दाखवत अधिकाऱ्यांचे खोटेपण उघड केले. त्या व्हिडीओमध्ये स्वच्छता कर्मचारी रुग्णांना टाके मारताना तर सफाई कामगार ईसीजी काढताना दिसत होते. हा प्रकार समोर येताच बैठकीत एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना अधिकारी खोटी माहिती देऊन जनप्रतिनिधींनाच दिशाभूल करत आहेत. लोकांना उपचार नाहीत, सुरक्षित घरे नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत व अधिकारी मात्र सगळे आलबेल असल्याचे सांगत आहेत. हा सरळसरळ बेजबाबदारपणा आहे, अशा शब्दांत खासदारांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

जर्जर इमारतीच्या मुद्दा ऐरणीवर

नटवर पारेख कंपाऊंडमधील जर्जर इमारतींचा मुद्दाही बैठकीत गाजला. गेली तीन वर्षे दुरुस्ती रखडल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ठिकठिकाणी गळती, भेगा आणि धोकादायक परिस्थिती असूनही अधिकारी केवळ पाण्याचे बिल व मालमत्ता कर भरा, मग काम करू अशी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बैठकीत प्रत्येक विभागाचा अधिकारी दुसऱ्या विभागाकडे जबाबदारी ढकलताना दिसत होता. नागरिकांच्या प्रश्नांबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे पाहून खासदारांनी राग व्यक्त केला.
जर सर्व निर्णय वरिष्ठच घेणार असतील तर अशा बैठका घेऊन वेळ वाया घालवण्याचा काय उपयोग?
असा सवाल उपस्थित केला. नागरिकांच्या प्रश्नांवर कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि जनतेप्रती असलेली उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी अखेर बैठक सोडून बाहेर पडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व फक्त कागदोपत्री कामे दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

Web Title: Devnar dumping ground pollution sanjay dina patil slams bmc officials news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Pollution

संबंधित बातम्या

Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजीचा भडका! सलग दुसऱ्यांदा दरात वाढ; आता ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होणार?
1

Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजीचा भडका! सलग दुसऱ्यांदा दरात वाढ; आता ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होणार?

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना
2

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई
3

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन
4

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.