Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
शुगर विथड्रॉवल – साखर खाण बंद केल्याच्या पहिल्या तीन ते सात दिवसांत, तुम्हाला डोकेदुखी, चिडचिड आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवू शकते. याला ‘शुगर विथड्रॉवल’ म्हणजेच साखर सोडल्यामुळे होणारी अस्वस्थता म्हणतात. पण ७ दिवस साखर पूर्णपणे बंद केल्यास सुस्ती आणि आळस दूर पळतील. साखरेच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि कमी होते, ज्यामुळे थकवा येतो. साखर सोडल्यानंतर, तुमची ऊर्जा पातळी दिवसभर स्थिर राहील.
वजन कमी होईल– साखरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते म्हणून साखर खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. जर तुम्ही ६० दिवस साखर खाणं बंद केली तर शरीरातील जमा झालेले फॅट बर्न होण्यास सुरुवात होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते आणि वजन देखील झपाट्याने कमी होते.
चेहऱ्यावर येईल ग्लो– जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजनचे नुकसान होते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि मुरुमे येतात. ६० दिवस साखर सोडल्याने तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसते.
हृदयाचे आरोग्य– साखर खाणे बंद केल्याने शरीरातील सूज कमी होते. यामुळे रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याशिवाय, लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
एकाग्रता आणि चांगली झोप– रिसर्चमधून असे दिसून आले आहे की, अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. म्हणून, साखर खाणं बंद केल्याने एकाग्रता सुधारते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय मूड सुधारतो. तसेच, रात्री अधिक गाढ आणि शांत झोप लागते.
Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर






