Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharavi News: धारावी पुनर्विकासात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही मिळणार हक्काचे घर; ‘हायर-परचेस’ योजनेचा ऐतिहासिक निर्णय

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील रहिवाशांना ३०० चौ. फुटांचे घर मिळणार आहे. जाणून घ्या पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि 'हायर-परचेस' योजनेचे फायदे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 07:41 PM
धारावी पुनर्विकासात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही मिळणार हक्काचे घर (Photo Credit- X)

धारावी पुनर्विकासात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही मिळणार हक्काचे घर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • धारावी पुनर्विकासात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही मिळणार हक्काचे घर
  • ‘हायर-परचेस’ योजनेचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई, ता. 3 : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या आजवरच्या निकषांना छेद देत,धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय राबविण्यात येणार आहे. मात्र, वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता ही मुख्यत्वे तळमजल्यावरील सदनिकाधारकाच्या पात्रतेवर अवलंबून असणार आहे.

वास्तविक, 4 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी धारावीत वास्तव्याला वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील पुनर्विकासात सामावून घेतले जाणार आहे. या सदनिकाधारकांना धारावीबाहेर, मात्र मुंबई महानगरप्रदेशात (एमएमआर) 300 चौरस फुटांचे घर मिळू शकेल. त्यासाठी त्यांना भाडेकरार – खरेदी ( हायर -परचेस) योजनेचा लाभ घेता येईल; किंवा 25 वर्षांसाठी नाममात्र भाडे भरून 26 व्या वर्षी घरचा मालकी हक्क मिळवता येईल. तसेच उर्वरित रक्कम अदा करून 25 वर्षांच्या कालावधीत कधीही घराचे मालक होता येईल.

“वास्तविक, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना कोणताही लाभ न देता प्रकल्पातून वगळले जाते. मात्र, धारावी पुनर्विकास प्रकल्प याला अपवाद आहे. वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पुनर्विकासात सामावून घेणारा हा देशभरातील पहिला प्रकल्प असेल. या निर्णयामुळे हा प्रकल्प मानवकेंद्रित आणि सर्वसमावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे” अशी प्रतिक्रिया धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) अधिकाऱ्याने दिली.

“हायर-परचेस धोरणातील महत्त्वपूर्ण तरतुदींमुळे धारावीकरांना हक्काचे घर सहजरित्या घेता येऊ शकेल. भाडेकराराची उर्वरित रक्कम भरून हवे तेव्हा घराचा मालकी हक्क धारावीकरांना मिळवता येईल” अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पुनर्विकासाचा लाभ घेण्यासाठी वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना, अंतिम मुदतीपूर्वीच्या (कट ऑफ डेट) वास्तव्याचा पुरावा सादर करावा लागेल. त्यासाठी,4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार दस्तावेजांची पूर्तता करावी लागेल.

पात्रतेच्या प्राधान्यक्रमातील शेवटच्या पर्यायात जर तळमजल्यावरील सदनिकाधारक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता आपली पात्रता सिद्ध करू शकला नाही, तर वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता देखील धोक्यात येऊ शकते. “अशा परिस्थितीत पात्रतेसाठी कोणतेही प्रतिज्ञापत्र विचारात घेतले जाणार नाही” अशी माहिती डीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. वरच्या मजल्यावरील बहुतांशी सदनिकाधारक अशा प्रकारची प्रतिज्ञापत्र सादर करत असल्याची बाबाही त्यांनी निदर्शनास आणली. याचाच अर्थ असा की वरच्या मजल्यावरील पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या सुरुवातीच्या 4 प्राधान्यक्रमांपैकी त्यांच्याकडे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मराठी भाषा शिकविण्यासाठी अभिनव उपक्रम! पवई बेंगॉली वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार; ३ बाबींवर भर

काही प्रकरणांमध्ये डीआरपीकडे वरच्या मजल्यावरील एफ-1 आणि एफ -2 अशा युनिट्सची कागदपत्रेही आली आहेत. याबाबत माहिती देताना डीआरपी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले की, “शासन निर्णयानुसार जर झोपडीच्या वर अनेक मजले अस्तित्वात असतील, तर प्रत्येक मजल्यावरील कुटुंबप्रमुखाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मात्र, जर हे वरचे मजले आणि तळमजला हे एकच युनिट मानले, तर प्राधान्यक्रमांक-5 अन्वये प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे,ज्यामध्ये वरच्या मजल्यावरील मजला क्रमांक आणि वास्तव्याचा कालावधी याबाबत तळमजल्यावरील सदनिकाधारकाकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे”

शासन निर्णयानुसार, पुनर्विकासात प्रत्येक कुटुंबाला एकच घर मिळणार असून एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलांना स्वतंत्रपणे अर्ज दाखल करता येणार नाहीत. तसेच, मुंबई महानगर प्रदेशातील इतर कोणत्याही गृह योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तींना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा लाभ घेता येणार नाही.

वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तावेज आणि त्यांचा प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम-1 : वरच्या मजल्यावरील कुटुंबप्रमुखाच्या नावे असलेले विजेचे बिल. कट ऑफ डेट पूर्वीचे आणि अलीकडचे वीजबिल आवश्यक आहे.

प्राधान्यक्रम -2 : वरच्या मजल्याचा पत्ता नमूद असलेला नोंदणीकृत भाडेकरार. कट ऑफ डेट पूर्वीचा आणि अलीकडचा भाडेकरार आवश्यक आहे.

प्राधान्यक्रम 3 : वरच्या मजल्याचा पत्ता नमूद असलेला नोंदणीकृत खरेदी करार आणि नोटरी केलेले संमतीपत्र. कट ऑफ डेट पूर्वीचा आणि अलीकडचा करार आवश्यक आहे.

प्राधान्यक्रम -4: कट ऑफ डेट पूर्वी,वरच्या मजल्याच्या पत्ता नमूद केलेले आधारकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र.

प्राधान्यक्रम-5: वरच्या मजल्यावरील कुटुंब प्रमुखाचे प्रतिज्ञापत्र आणि तळमजल्यावरील कुटुंबप्रमुखाचे या संदर्भातील प्रमाणपत्र. यासाठी तळमजल्यावरील सदनिकाधारक पात्र असणे आवश्यक आहे.

Protocol for MPs and MLAs: दोषी आमदार-खासदारांना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Web Title: Dharavi redevelopment upper floor tenants eligibility higher purchase scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • dharavi
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.