Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींनो, मोबाईल चेक करा ! मे महिन्याचा हफ्ता मिळण्यास झाली सुरुवात, मेसेज न आल्यास…

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 12:15 PM
राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात असला तरी, तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा ‘एसएमएस’ प्राप्त झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे.

या पार्श्वभूमीवर, पात्र लाभार्थ्यांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. त्याऐवजी, आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल अॅपवरून ‘बँक स्टेटमेंट’ तपासावे किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन आपले पासबुक अपडेट करून घ्यावे. पासबुकच्या नोंदीवरून खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही, याची अचूक माहिती मिळू शकेल.

अपात्रतेची प्रमुख कारणे कोणती?

– उत्पन्नाची मर्यादा : काही महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा जास्त असल्याचे आढळले.

– तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटी : प्रशासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या, अपूर्ण कागदपत्रे, दुबार अर्ज आणि चुकीच्या माहितीमुळे अनेक अर्ज बाद झाले.

– लिंकिंगची समस्या : आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे आणि मोबाईल क्रमांक बदलल्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा फटकाही लाखो महिलांना बसला.

विविध त्रुटी, निकषांची पूर्तता न केल्यामुळे ७० लाख महिला अपात्र

शासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या दीड वर्षांपासून या अर्जाची अत्यंत कसून छाननी आणि पडताळणी सुरू होती. शासनाने ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली. या प्रक्रियेत एप्रिलअखेर राज्यामधील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, विविध त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे जवळपास ७० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Web Title: Disbursement of the ladki bahin scheme may installment has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?
1

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
2

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती  मुख्य कारणे?
4

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.